Sange Accident Case | सांगे येथील निरोलेक कंपनीच्या मशीन स्फोटात तरुणाचे दोन्ही हात निकामी; कुटुंब संकटात

Sange Accident Case | कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने गावकर कुटुंब संकटात
Sange Accident Case
Sange Accident Case
Published on: 
Updated on: 

सांगे : पुढारी वृत्तसेवा
भाटी, सांगे येथे राहणारे आणि निरोलेक कंपनीत काम करणारे वैभव उमाकांत गावकर हे मशीनवर काम करताना झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले असून, पाठीवरही जखमा झाल्या आहेत. मात्र, कंपनी आणि ईएसआयसीकडून मदत मिळत नसल्याने गावकर कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

Sange Accident Case
Beed Crime| कायदा सांगे लोकांला अन् छळती आपल्याच सुनेला..!

न्याय मिळावा, यासाठी वैभव गावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली.
वैभव गावकर हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहेत. त्यांच्यासोबत आई राहते. दीड वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून, त्यांना सात ते आठ महिन्यांचा मुलगा आहे.

गावकर यांनी सांगितले की, मशीन चालवताना त्यात पावडर भरत असताना अचानक स्फोट झाला आणि त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. पगारातून पीएफ आणि ईएसआयचे पैसे कापले जात असूनही ईएसआयसीकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. सध्या दुसऱ्याच्या मदतीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

Sange Accident Case
CM Pramod Sawant | 'सुभाष फळदेसाईंना डावलले जाणार नाही!' सांगे मतदारसंघातील पेचावर मुख्यमंत्री अन् दामू नाईक यांचे आश्वासन

कंपनीने जबाबदारी घ्यावी : मंत्री फळदेसाई

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, वैभव यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर निरोलेक कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी (एचआर) सुमारे २५ वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, भेटण्याची आश्वासने देण्यापलीकडे कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अपघात झाल्यानंतर कामगाराची जबाबदारी कंपनीने घ्यायला हवी.

वैभव यांच्या कुटुंबावर कर्जाचे ओझे असून, पत्नी, लहान मुलगा आणि आईची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भविष्यात त्यांना काम करणेही शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. कंपनीने नुकसानभरपाई देऊन त्यांना आर्थिक आधार द्यावा, असे आवाहन फळदेसाई यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news