World Book Day | मध्यवर्ती ग्रंथालयात दुर्मीळ दस्तावेजांचे डिजिटायझेशन

३४ लाख पानांचे स्कॅनिंग पूर्ण : ऐतिहासिक वारसा जतनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
goa library
१) पणजी : दुर्मीळ कागदपत्रांचे मायक्रोफिल्म रूपांतरण. २) पणजी: कृष्णदास शामा गोवा मध्यवर्ती ग्रंथालय.
Published on
Updated on

पणजी : काव्या कोळस्कर जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णदास शामा गोवा मध्यवर्ती ग्रंथालयाने ज्ञानसंवर्धनाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. आशियातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक असलेल्या या ग्रंथालयात पोर्तुगीजपूर्व, पोर्तुगीजकालीन आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील तसेच कित्येक शतकांमागील दुर्मीळ दस्तऐवज, ग्रंथ, पोथी, वर्तमानपत्रे आणि गॅझेटस् जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, आतापर्यंत तब्बल ३४ लाख, ३१ हजार ३११ पानांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. ग्रंथालयाच्या क्युरेटर सुलक्षा कोलमुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुस्तक संवर्धन प्रक्रियेत तीन प्रमुख टप्पे आहेत.

goa library
Goa |गोवंश हत्याबंदी कायदा देशभर लागू करा

स्कॅनिंग, मायक्रोफिल्मिंग आणि डिजिटायझेशन. मायक्रोफिल्मिंग ही जुनी माहिती साठवण पद्धत असून त्यासाठी विशेष मायक्रोफिल्म रीडरची आवश्यकता असते. तर डिजिटायझेशनमुळे माहिती पीडीएफ स्वरूपात साठवली जात असल्याने कमी जागेत सुरक्षितरीत्या जतन करता येते आणि ती सहज उपलब्धही होते. डिजिटायझेशन ही जरी सध्याच्या काळातील पद्धत असली तरी त्याचे पुन्हा मायक्रोफिल्ममध्ये रूपांतर केले जाते; कारण मायक्रोफिल्मिंग AA जागतिक पुस्तक दिन विशेष ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या योजनेतून सुरू असून ती राज्य आयटी विभागांतर्गत राबवली जात आहे.

इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवामार्फत दिल्लीस्थित एजन्सीकडे स्कॅनिंग व संवर्धनाचे काम सोपवण्यात आले साठवणूक पद्धत २०० हून अधिक वर्षे माहिती अबाधित ठेवण्यास उपयुक्त ठरते. जागतिक पुस्तक दिन विशेष आहे. हे दुर्मीळ कागदपत्रांचे जतन पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्यात ते सामान्य नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ज्ञानाच्या या खजिन्याचे डिजिटल रूपांतर हे वाचनसंस्कृतीला चालना देणारे आणि इतिहास जपणारे पाऊल ठरत आहे.

goa library
Goa Off the record |ऑफ दि रेकॉर्ड....

अखेरीस पानांचे लॅबमध्ये जतन

सध्या ग्रंथालयात अनेक दशकांपूर्वीची पुस्तके, ग्रंथ, हस्तलिखिते असून पानांना हात लावणेही कठीण आहे. ही संपूर्ण जतन प्रक्रिया अतिशय नाजूक असल्याने दुर्मीळ दस्ताऐवजांची हाताळणी खूप काळजीपूर्वक करावी लागते. त्यांची प्रत्यक्ष प्रत जतन करण्यासाठी त्यांचे स्कॅनिंगनंतर मायक्रोफिल्मिंग -डिजिटायझेशन या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रंथालयाच्या वैयक्तिक स्वतंत्र प्रिझर्वेशन लॅबमध्ये विविध रसायनांचा वापर करून प्रत्येक पानाचे विशिष्ट पद्धतीने जतन केले जाते. शेवटी पुस्तकाची सर्व पाने एकत्र जोडून पुन्हा त्याला पूर्वरूप देऊन संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली जाते.

या योजनेनुसार सध्याच्या घडीला प्रमुख ४ टप्प्यांमध्ये सर्व जुने स्वातंत्र्य काळातील, पोर्तुगीजकालीन, धार्मिक ग्रंथ पोथी, गॅझेट, वृत्तपत्रे, दुर्मिळ हस्तलिखिते जतन करण्याचे प्रयोजन आहे. त्यातील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. एकंदरीत प्रक्रिया ही दीर्घकालीन आणि नाजूक असल्याने ग्रंथालयात सुरू असलेले दैनंदिन काम डोळ्यात तेल घालून करावे लागते. प्रमुख ४ टप्प्यांत सर्व जुन्या दुर्मिळ कागदपत्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया राज्य सरकारच्या सहकाऱ्याखाली दैनंदिन स्तरावर राबवण्यासाठी ग्रंथालयात सर्वतोपरी मेहनत घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news