Mandrem Water Project | मांद्रे मतदारसंघाला दिलासा; तुये पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात; CM सावंत यांच्याकडून आढावा

Mandrem Water Project | तुये येथील पाणी प्रकल्पाच्या कामाचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून आढावा
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

आमदार झाल्यानंतर मांद्रे मतदार संघातील पाण्याची समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी आपले प्रयत्न झाले. आता तुये आयटीआय परिसरात ३० एम एल डी पाणी प्रकल्प युद्धपातळीवर काम सुरू आहे. मार्च महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल, असा विश्वास आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

CM Pramod Sawant
Goa news | तिरमला तिरुपती मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेची एनओसी रद्द

तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मांद्रे मतदारसंघासाठी उभारण्यात येत असलेला पाणी प्रकल्प मांद्रेवासियांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पाण्याची समस्या पूर्णपणे सुटण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत आणि हा प्रकल्प लवकरात लवकर लोकार्पण करून जनतेची तृष्णा भागवली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मद्रिवासीयांना किमान १२ तास नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी गावागावात पाण्याच्या टाक्याही उभारण्याचे काम सुरू झालेले आहे, अशी माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली. या पाणी प्रकल्पाची पाहणी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. त्यावेळी माहिती देताना सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे तुये हॉस्पिटल उद्घाटन समारंभाला आले होते. त्यावेळी त्यांनी तुये आयटीआय परिसरात ३० एमएलडी पाणी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यासोबत आमदार आरोलकर यांनी पाणी प्रकल्पाची पाहणी केली.

आमदार आरोलकर यांनी सांगितले, मद्रि मतदार संघात विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बदल होण्याची गरज आहे आणि हा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपणास शंभर टक्के सहकार्य करत असल्यामुळे हे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगून कित्येक वर्षापासून मांद्रे मतदार संघातील जनता पाण्याच्या समस्यांचा सामना करत होती.

CM Pramod Sawant
AI cancer diagnosis Goa | एआयद्वारे कॅन्सरचे निदान करणारे गोवा पहिले राज्य

अनेकवेळा अडचणी आल्या, परंतु सार्वजनिक बांधकाम खाते विभागाने हा पाणी प्रकल्प उभारून येत्या काळात मांद्रे मतदार संघातील जनतेला १२ तास पाणीपुरवठा करण्याची योजना असल्याचे सांगून मांद्रे मतदार संघाचा होणारा कायापालट येत्या काही दिवसांत स्पष्ट दिसेल,

विविध प्रकल्पांची कामे होतील

तुये हॉस्पिटल गोमेकॉ हॉस्पिटलला लिंक झाल्यानंतर अनेक आरोग्याच्या समस्या सुटणार आहे. मांद्रे मतदारसंघातच चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा चालूच राहील. येत्या काळात रवींद्र भवनची पायाभरणी एक्वेरियम प्रकल्प, क्रीडा मैदान असे वेगवेगळे प्रकल्प सरकाराच्या माध्यमातून मार्गी लावले जाणार आहेत.

रोजगार उपलब्ध होईल : आरोलकर

प्राधान्य क्रमाने तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीकडे लिंक रस्ता आवश्यक आहे. तो लिक रस्ता झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या या इलेक्ट्रॉनिक सिटी मध्ये दाखल होणार, त्यातून हजारो बेरोजगार सुशिक्षित युवा-युवतींना चांगल्या पगाराच्या संधी मिळतील. त्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे आमदार आरोलकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news