Soham Naik POCSO Case | "पोक्सो का लावला नाही? प्रकरण कमकुवत करताय का?" विजय सरदेसाईंनी पोलीस निरीक्षकांना धरले धारेवर

Soham Naik POCSO Case | विजय सरदेसाईंसह आलेल्या शिष्टमंडळाचा कुडचडे पोलिस निरीक्षकाला जाब
Soham Naik POCSO Case
Soham Naik POCSO Case
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

जवळपास १६ अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमपाशात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडिओ 1 काढणाऱ्या सोहम नाईक या या संशयित आरोपीने सोशल केलेल्यापैकी सर्व मुली अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात 1 पॉक्सो आणि बाल संरक्षण कायदासारखे गुन्हे न नोंदवता केवळ भारतीय न्याय संहिता व आयटी अॅक्ट - सारखे गुन्हे नोंद करून हे प्रकरण न कमकुवत केले जात आहे का असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी - पोलिस निरीक्षक नेल्सन कुलासो यांच्यासमोर उपस्थित केला..

Soham Naik POCSO Case
School Harassment Case | मासिक पाळीवरून अमानुष छळ! मडगावच्या 'त्या' विद्यार्थिनीची परीक्षेपूर्वीच तणावाखाली झुंज; पायऱ्यांवरून कोसळली

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह आलेल्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षकांना घेराव घालून चांगलेच धारेवर झाले. सरदेसाई यांनी एक तासाचा अवधी देऊन ताबडतोब कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांनी संशयित सोहम नाईक याच्या विरोधात पोक्सो आणि - बाल कायदा गुन्हा दाखल करावा लागला आहे.

संशयित सोहम नाईक याला अटक करून त्याच्या विरोधात आवश्यक असलेले कायदे व कलमे न वापरल्याचे कळताच शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यावर धाव घेतली. यात महिला संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस, माजी नगरसेवक पुष्कल सावंत देसाई, दत्तराज राऊत देसाई यांच्यासह कुडचडेतील इतर नागरिकांचा समावेश होता.

पोलीस निरीक्षक नेल्सन कुलासो यांची भेट घेऊन त्यांच्याशी या प्रकरणी सविस्तरपणे चर्चा केली. पोलीस निरीक्षक कुलासो यांच्यावर गंभीर आरोप करताना तुम्ही फोनवर बोलून हे प्रकरण सोडवू पाहत आहात.

सुमोटो पद्धतीने तक्रार नोंद करण्याचे सोडून तीन दिवस हे प्रकरण झुलवत ठेवले. एक तासाच्या आत आवश्यक ते गुन्हे नोंद करून या प्रकरणाला बळकटी द्यावी अन्यथा संपूर्ण गोवा बंद करून आम्हाला कुडचडे पोलीस स्थानकावर येऊन बसावे लागेल असा इशारा सरदेसाई यांनी दिला.

Soham Naik POCSO Case
Ponda By-election Goa 2026 | फोंड्याचा 15 वा आमदार कोण? 9 एप्रिलला रणसंग्राम; रितेश नाईक, केतन भाटीकर अन् गीतेश नाईक रिंगणात

तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नाही असे उत्तर पोलीस निरीक्षक कुलासो यांनी दिले असता ५० पेक्षा जास्त मुली या प्रकरणात अडकलेल्या आहेत आणि तरीही तुम्ही तक्रारदार येण्याची वाट पाहत आहात का असा प्रश्न अमित पाटकर यांनी उपस्थित केला.

दत्तराज राऊत देसाई यांनी यावेळी बोलताना सुरुवातीलाच सुमोटो पद्धतीने तक्रार नोंदवली असती तर लोक हातघाईवर आले नसते अशी माहिती दिली. सर्व पीडिता अल्पवयीन आहेत त्यामुळे त्यांचे नाव कुठेही येणार नाही याची काळजी आपण घेणार असल्याचे आवदा व्हिएगस म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news