Goa Market Issues | वास्कोतील फळ, भाजी विक्रेत्यांची सोय पार्किंगमध्ये

Goa Market Issues | नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी : लवकरच होणार जागेची आखणी
Goa Market Issues
Goa Market Issues
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

मासे मार्केटाच्या पहिल्या मजल्यावर ग्राहक येण्यास राजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजी, फळ विक्रेत्यांची सोय आता भुयारी पार्किंगच्या जागेत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांनी पाहणी केली आहे. भुयारी पार्किंगच्या जागेत त्या विक्रेत्यांना जागा आखून देण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांकडून समजते.

Goa Market Issues
Nashik Farmer News | थकबाकीदार 72 हजार 575 शेतकऱ्यांची माहिती अपलोड

मासे मार्केटाच्या तळमजल्यावर मासे विक्रेत्यांची सोय करण्यात आली आहे तर पहिल्या मजल्यावर भाजी, फळ विक्रेत्यांची सोय करण्यात आली आहे. तथापी पहिल्या मजल्यावर ग्राहकच येत नसल्याने आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचा दावा संबंधित भाजी, फळे विक्रेत्या महिलांनी केला आहे.

त्या ठिकाणी सुमारे तीसजणी भाजी, फळे विक्री करतात. पहिल्या मजल्यावर ग्राहकाची पावले वळत नसल्याने काहीजणांनी जिन्याच्या पायरयावर व मार्केटाच्या बाहेरील पदपथावर आपला व्यवसाय सुरु केला होता.

पदपथावर माल मांडणारयांचा माल जप्त करण्याची कृती मुरगाव पालिकेचे कामगार करतात. तथापी काहीजणी राजकारणी व्यक्तीच्या वरदहस्तामुळे मार्केटाच्या बाहेरील बाजूस आपला व्यवसाय करीत असल्याने इतरांनी नारजी व्यक्त केली होती.

याप्रकरणी त्या विक्रेत्यांनी नगराध्यक्ष बोरकर यांची भेट घेऊन आम्हाला मार्केटाच्या पदपथावर माल विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. तथापि बोरकर यांनी ती मान्य केली नाही. त्यांनी त्या विक्रेत्यांना भुयारी पार्किंग जागेत सोय करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

Goa Market Issues
Mirabag Bandhara Protest | मीराबाग बंधाराप्रश्नी संगमेश्वर तिरी जागृती

पार्किंगच्य जागेचा वापर कोणीच करीत नसल्याने सध्या ती जागा विनावापर आहे. भुयारी पार्किंग जागेची पाहणी नगराध्यक्ष बोरकर, मुख्याधिकारी नाईक यांनी केली. तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल. बाकी सुविधा तेथे आहेत. तेथे लवकरच जागा देण्यात येतील. त्या जागेवर संबंधित विक्रेत्या आपल्या व्यवसाय करू शकतात, असे बोरकर म्हणाले.

बाहेरील फळ विक्रेत्यांना हटविणार...

शहर भागातील रस्ताकडेला बसणाऱ्या व परवाने असलेल्या सर्व फळ, भाजी विक्रेत्यांची तेथे सोय करण्यात येईल. देव दामोदर ट्रस्टची जागा महसूल खात्याची असल्याने या जागेच्या कुंपणालगत बाहेर असलेल्या फळ विक्रेत्यांना तेथून हटविण्यात येणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news