Nashik Farmer News | थकबाकीदार 72 हजार 575 शेतकऱ्यांची माहिती अपलोड

Nashik Farmer News | शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेकडून कार्यवाही
Khutil Ramwadi Farmer
Khutil Ramwadi Farmer NewsPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती संकलन करून अपलोड केली. रविवारी (दि.१५) अंतिम दिवशी जिल्ह्यातील ७८ हजार १७८ थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी ७२ हजार ५७५ (९९ टक्के) थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली असून, १ हजार ६०३ शेतकऱ्यांची माहिती विविध कारणांनी अपलोड होऊ शकली नसल्याचे सांगितले जात आहे.

Khutil Ramwadi Farmer
International Ayush Conference Dubai 2026 | दुबईतील आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत गोव्याची वेलनेस पर्यटनदृष्टी झळकली

आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लागली आहे. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून माहिती मागविली आहे.

३० सप्टेंबर २०२५ अखेरच्या थकबाकीदारांसह आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अल्प मुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत कर्जदारांच्या माहितीचा यात समावेश आहे. या सर्व कर्जदारांची माहिती सरकारकडून कर्जमाफी देण्यासाठी करण्यात आलेल्या पोर्टलवर भरण्याचे काम जिल्हा बँकेकडून सुरू आहे.

जिल्हा बँकेचे कर्मचारी गत आठवड्यापासून ही माहिती अपलोड करण्याचे काम अहोरात्र सुरू होते. त्यासाठी जिल्हा बँक प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. यासाठी बँकस्तरावर नोडल अधिकारी नियुक्त केले होते.

या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. माहिती अपलोड करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. रविवार अखेरचा दिवस असल्याने माहिती अपलोड करण्यासाठी बँकेत गर्दी होती.

Khutil Ramwadi Farmer
Nashik News | ग्राहकांची फसवणूक; 523 व्यावसायिकांवर गुन्हे

रविवार सायंकाळपर्यंत ७२ हजार ५७५ थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे. तालुकानिहाय माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. उर्वरित १ हजार ६०३ शेतकऱ्यांची माहिती अपलोड होऊ शकलेली नाही. प्रामुख्याने वारस नोंदी, आधारकार्ड नसणे, स्थलांतरित झाले या कारणांमुळे ही माहिती अपलोड झाली नसल्याचे सांगितले जात आहे..

रविवारीही कामकाज

दरम्यान, जिल्हा बँकेला रविवारी सुट्टी असते. परंतु, माहिती अपलोड करण्यासाठी बँकेचे कामकाज सुरू होते. कर्मचारी तालुक्यांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांकडे जाऊन माहिती अपलोड करत होते. स्थलांतरित झालेले थकबाकीदार शेतकरी शोधण्यात कर्मचारीवर्गाचा मोठा अवधी गेला. यात काही अंशी यश आले तर, काही अंशी अपयश मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news