

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
वाळपई नगरपालिकेच्या विविध ठिकाणी असलेले स्वतःच्या मालकीची दुकाने लिलावात काढण्यासाठी अखेर पालिकेला जाग आलेली आहे. वाळपई नगरपालिका प्रशासकीय इमारत वाळपई शहरातील मार्केट कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेले १३ गाळे नगरपालिका लिलावात काढणार आहे. त्यासाठी लिलाव नोटीस जारी करण्यात आलेली आहे.
वाळपई छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानाच्या शेजारी असलेले नवीन दुकाने नगरपालिका लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की वाळपई नगरपालिकेच्या स्वतःच्या इमारतीत असलेले अनेक दुकाने रिकामी आहेत. यामुळे नगरपालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडलेला आहे.
नगरपालिकेने सदर दुकाने लिलावात काढावीत, अशी मागणी मागणी करण्यात आली होती. शेवटी नगरपालिकेला जाग आलेली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या लीलावात नोटीसीमध्ये एकूण ९ गाळे लिलावात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
यासाठी २२ जानेवारी पर्यंत संबंधितांना फॉर्म भरावे लागणार आहे २७ रोजी या संदर्भात या निविदा उघडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. या संदर्भाची सविस्तर माहिती नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्याचे समजते.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यान शेजारी असलेले तीन दुकाने लीलाव होणार असल्याचे नगरपालिकेने स्पष्ट केलेले आहे यामध्ये गाळा क्रमांक २. ३, ४ याचा समावेश आहे. नगरपालिका उद्यानाचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी २४ रोजी करण्यात आले होते. त्याचवेळी या दुकानांचा लिलाव करणे गरजेचे होते.