Casino Issues Panjim | कॅसिनोच्या कचाट्यातून पणजीला सोडवणार! महापालिका निवडणुकीसाठी उत्पल पर्रीकरांचा मास्टर प्लॅन

Casino Issues Panjim | उत्पल पर्रीकर यांचे प्रतिपादन : लोकांना हवाय बदल
Casinos
Casinos
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कॅसिनोमुळे पणजीत होणाऱ्या समस्या सोडविण्यास आम्ही प्राधान्य देऊ. पणजीकरांना बदल हवा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आमच्या पॅनलला पाठिंबा मिळेल, असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला.

Casinos
Lasalgaon Onion Price Drop | केंद्राचा 'रोडटेप'वर यू-टर्न, पण लासलगावच्या शेतकऱ्यांना 6 तासांत बसला 2 कोटींचा फटका!

उत्पल पर्रीकर म्हणाले, कॅसिनोमुळे पणजीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. कॅसिनोमुळे शहरात वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या निर्माण झाली आहे. या तसेच अन्य सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

या समस्या सोडविण्यासाठी सरकारने पणजीसाठी विशेष निधी दिला पाहिजे. पार्किंगमध्ये काही जागा स्थानिकांसाठी आरक्षित असली पाहिजे. पे पार्किंगमधून येणाऱ्या महसुलातून पणजीत पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

Casinos
Utpal Parrikar Panaji Election | पणजीला 'पिता-पुत्राच्या' कचाट्यातून वाचवा! उत्पल पर्रीकर आणि 'आप'चा महापालिकेत एकत्र एल्गार

याबाबत देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. पर्रीकर म्हणाले की, आम्ही आमच्या पॅनलच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार आहोत.

दोन ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. पक्ष, विचारसरणी यापेक्षा आम्ही उमेदवार योग्य आहे का, याचा विचार करून उमेदवारी दिली असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news