Utpal Parrikar Panaji Election | पणजीला 'पिता-पुत्राच्या' कचाट्यातून वाचवा! उत्पल पर्रीकर आणि 'आप'चा महापालिकेत एकत्र एल्गार

Utpal Parrikar Panaji Election | त्यासाठी आम्ही पणजीकरला साथ द्या; उत्पल पर्रीकर, सुरेंद्र फुर्तादो यांच्यासह नेत्यांचे आवाहन
goa news -
goa news -
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी शहराला पिता-पुत्राच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी आणि पणजीच्या हितासाठीच सर्व पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आम्ही पणजीकर पॅनलला पाठिंबा द्या. या पॅनलतर्फे युवा आणि शिक्षित उमेदवार दिले आहेत.

goa news -
Goa Startups Ecosystem | गोव्याच्या भविष्यासाठी 'डिजिटल' पाऊल; 'कॉन्व्हर्ज ३.०' मधून नवा क्रांतीचा विचार

पणजीच्या नागरिकांनी या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे आणि पणजी वाचवावी, असे आवाहन आम्ही पणजीकर पॅनलचे नेते उत्पल पर्रीकर, सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक व आपचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केले.

पणजी महापालिकेसाठी मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आम्ही पणजीकर पॅनलच्या २० उमेदवारांनी मंगळवारी (दि. २४) अर्ज भरले. त्यावेळी आपचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी उपस्थित राहन आम्ही पणजीकर पॅनलला आपची पाठिंबा जाहीर केला.

उत्पल पर्रीकर यांनी सांगितले की, आम्ही पणजीकरतर्फे शिक्षित चांगले उमेदवार दिले आहेत. पिता पुत्राने पणजीला वेठीस धरले आहे. त्यांच्या कचाट्यातून पणजीला सोडवून पणजीचा विकास करण्यासाठी पणजीच्या लोकांनी आम्ही पणजीकर पॅनलच्या उमेदवाराना पाठिंबा द्यावा, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले की, आम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील अशाप्रकारचे शिक्षित उमेदवारी दिल्याचे नाईक यांनी सांगितले. सुरेंद्र फर्तादो यांनी सांगितले, सर्व पक्षांनी एकत्र येऊन पणजी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत; त्यासाठी पणजीकरांनी आम्हाला साथ द्यावी.

goa news -
Lasalgaon Onion Price Drop | केंद्राचा 'रोडटेप'वर यू-टर्न, पण लासलगावच्या शेतकऱ्यांना 6 तासांत बसला 2 कोटींचा फटका!

मनोहर पर्रीकरांच्या काळात नगरसेवक असलेल्या शुभदा शिरगावकर, शुभदा धोंड, डॉ. शीतल नाईक यांनी आम्ही पणजीकर पॅनलमधून अर्ज भरलेत.

भाजपच्या महिला नेत्याही उमेदवार

भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष राहिलेल्या व महापालिकेवर दोनवेळा यापूर्वी निवडून आलेल्या डॉ. शीतल नाईक यांनीही प्रभाग ६ मधून आम्ही पणजीकर पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्या भाजप पुरस्कृत उमेदवाराविरोधात लढणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news