Unity Mall Goa Protest | युनिटी मॉल प्रकल्प रद्द करा; चिंबलवासीयांचा ठाम इशारा

Unity Mall Goa Protest | युनिटी मॉल, प्रशासन स्तंभाला जोरदार विरोध
Unity Mall Goa Protest
Unity Mall Goa Protest
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

चिंबलच्या पठारावर होऊ घातलेल्या युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभया सरकारी प्रकल्पांमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. त्यासोबतच येथील पुरातन तळीचे अस्तित्व नष्ट होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प येथे नकोच, असा एल्गार रविवारी चिंबलवासीयांनी केला. सरकारने लोकांच्या विरोधाला न जुमानता प्रकल्प पुढे नेण्यास उग्र आंदोलन पुकारू, असा इशारा चिंबल पठारावर आयोजित जाहीर सभेत देण्यात आला. यावेळी राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Unity Mall Goa Protest
Goa helmet rule: दुचाकींवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती

पणजी ते जुने गोवे या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला प्रशासन स्तंभआणि युनिटी मॉल या दोन प्रकल्पांची काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आभासी पद्धतीने पायाभरणी केली होती. जिल्हा पंचायत निवडणुका संपल्यानंतर सदर प्रकल्पांपैकी युनिटी मॉलचे काम सुरू करण्याचा प्रयत्न पर्यटन खात्याने केला असता, चिंबल जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली चिंबलच्या नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करत उपोषण सुरू केले होते.

याचदरम्यान गोविंद शिरोडकर हे न्यायालयात गेले असता, न्यायालयाने युनिटी मॉल प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती दिली. याप्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी ठेवली आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे रविवारी या सदर प्रकल्पाच्या शेजारील जागेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, आरजीचे आमदार वीरेश बोरकर, आपचे माजी अध्यक्ष अॅड अमित पालेकर, सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर, आरजीचे अध्यक्ष मनोज परब, खजिनदार अजय खोलकर, गोवा फाऊंडेशनचे क्लाऊड आल्वारिस व चिंबलवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पाला स्थगिती असतानाही जबदरदस्तीने काम सुरू ठेऊन सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. या भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती व पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. त्यामुळे युनिटी मॉल प्रकल्प त्वरित रद्द करावा, सरकारने ही मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन उभारू. त्यासोबतच येथेच नव्हे तर राज्यात कुठेही गोवा वाचवण्याच्या आंदोलनाला चिंबलचे नागरिक पाठिंबा देतील, असे गोविंद शिरोडकर यांनी सांगितले. युनिटी मॉलमुळे आदिवासी लोकांच्या उपजीविकेवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या ठिकाणी आयटी प्रकल्प आणण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. मात्र, ग्रामस्थांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता. आता पुन्हा युनिटी मॉल प्रकल्प आणला जात असल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला. ...तर सरकारी कार्यालयांसमोर उपोषण युनिटी मॉलचे काम सरकारने सुरुच ठेवले तर चिंबलचे ग्रामस्थ पर्यटन खाते, पंचायत खाते व अन्य संबंधित खात्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करतील. हे आंदोलन सुरुच राहील.

हा लढा फक्त युनिटी मॉलच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया चिंबलचे अजय खोलकर यांनी दिली. प्रकरण न्यायालयात : आमदार फर्नांडिस चिंबल युनिटी मॉलचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत किंवा आंदोलनाबाबत आपण काहीच बोलणार नाही. न्यायालयाचा निवाडा सार्वांना मान्य करावा लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी दिली.

राखणदार वेशभूषेने वेधले लक्ष

या सभेवेळी एक स्थानिक नागरिक 'राखणदार' वेशात सहभागी झाला. त्यामुळे आंदोलनाला वेगळेच प्रतिकात्मक स्वरूप मिळाले. या वेशातून गावाच्या जमिनी, पाणीस्रोत आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला. हा राखणदार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

सरकार बदलण्याची गरज :

परब KAR मनोज परब म्हणाले, जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत लोकांवर अन्याय होत राहणार आहेत. त्यामुळे सरकार बदलण्याची गरज असून, सरकारविरोधी आंदोलनात आरजी पूर्ण ताकदीने उतरेल, असेही ते म्हणाले.

गोवा वाचविण्यासाठी उठाव :

आमदार बोरकर आजच्या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आहेत. हा गोवा वाचविण्यासाठीचा उठाव असून, यापुढे गोव्यात होणाऱ्या बड्या प्रकल्पांना असाच विरोध होईल. गोवेकरांमध्ये जोश भरला आहे, हा जोश असाच कायम ठेवा व सरकारला धडा शिकवा. स्थानिकांना विश्वासात न घेता कुठलाच प्रकल्प गोव्यात नको, ही आमची मागणी आहे. राज्य सरकार बिल्डर व माफियांच्या हितासाठी स्थानिकावर अन्याय करून नको ते प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असून, ते प्रकार आता खपवून घेणार नसल्याचा इशारा आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिला.

Unity Mall Goa Protest
World marathi conference 2025 in goa: पणजीत ९ पासून जागतिक मराठी संमेलन

आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा :

युरी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, राज्य सरकारने गोवा विकायला काढला आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, आदिवासी बांधवांच्या हक्काचे संरक्षण " करण्यासाठी गोवेकरांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगून चिंबलच्या नागरिकांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले

गोवा फॉरवर्ड,

आपचे आमदार अनुपस्थित आजच्या सभेला विरोधातील सर्व सातही आमदार उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा यांच्यासह काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्टा अनुपस्थित राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news