

पणजी : जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित शोध मराठी मनाचा, २१ वे जागतिक मराठ संमेलन ९ ते ११ जानेवारी दरम्यान पणजी येथील कला अकादमी येथे होणार आहे. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आहेत.
शुक्रवार, दि. ९ जानेवारी रोजी दुपारी २ वा. चित्रपटातील मराठी माणूस या विषयावर प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेण्यात येईल. ब्रिटिश नंदी त्यांच्याशी संवाद साधतील. २.४५ वा. लक्ष्मीची पाऊले चर्चासत्रात अनिल खंवटे (गोवा), भरत गीते (जर्मनी), वैभव खांडगे (इंग्लंड) सहभागी होतील. संध्या. ४ वा. चंद्रभागेच्या तीरावर (चक्रीभजन) श्री नाथ संस्थान, औसा सादर करतील. ५.१५ वा. संजीवन संगीत अकादमीचे कलाकार नांदी सादर करतील.
संमेलनाचे उद्घाटन ९ रोजी सायंकाळी ५.३० वा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, गोव्याचे साबांखात्याचे मंत्री दिगंबर कामत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर आदी उपस्थित राहतील. यावेळी जागतिक मराठी भूषण सन्मान अनिल खंवटे यांना, तर कला जीवन गौरव सन्मान अभिनेते महेश मांजरेकर यांना प्रदान केला जाईल. सायंकाळी ७.३० वा. मर्मबंधातली ठेव हा सवेश नाट्य संगीताचा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाचे निर्माते नितीन कोरगावकर आहेत.
शनिवार दि. १० रोजी सकाळी ९ वा. मांडवीच्या तीरावर गोव्यातील कवींचे संमेलन कला अकादमीच्या कृष्ण कक्षात डॉ. महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. ९.३० वा. 'माझा चित्रपट प्रवास'वर आदित्य जांभळे सहभागी होतील. १० वा. समुद्रापलीकडे भाग-१ मध्ये शैलजा पाईक, माधव गोगावले, डॉ. अनिल देसाई, सई गणबोटे (अमेरिका), उर्मिला देवेन (जपान), राहुल उरमकर (केनिया), जीवन कर्षे (जर्मनी) आदी सहभागी होतील.
त्यानंतरच्या विविध सत्रात डॉ. रामराव वाघ, डॉ. मनोहर चासकर, प्रसाद शिरगावकर, दीपक नार्वेकर, प्रा. मनोज कामत, चंद्रकात दळवी, दत्तात्रय वारे, परेश प्रभू, चिगेंमद्र पुरानीक आदी सहभागी होतील. संध्या. ६.३० वा. चित्र शिल्प काव्य सत्रात प्रमुख उपस्थिती डॉ. श्यामकांत देवरे यांची असेल. यात संजय हरमलकर (चित्रकार), सचिन मदगे (शिल्पकार), अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, विजय चोरमारे, अंजली ढमाळ, तुकाराम धांडे, नारायण पुरी, प्रशांत मोरे, दत्तप्रसाद जोग, चंद्रशेखर गवस, रुजारिओ पिंटी, गुंजन पाटील आदी सहभागी होतील. रात्री ८.३० वा. रुद्रेश्वर, पणजी तर्फे पालशेतची विहीर नाट्यप्रयोग सादर होईल.
रविवार दि. ११ रोजी सकाळी ९.३० वा. सूर-संवाद चित्रफीत संवाद सत्रात किरण प्रधान (ऑस्ट्रेलिया) यांच्याशी नेपोलियन आल्मेदा (ऑस्ट्रेलिया) संवाद साधतील. १० वा. समुद्रातील सोने व समुद्रापलीकडे भाग-२ मध्ये डॉ. अनिल वळसंगकर (गोवा), किशोर गोरे, शशिकांत पानट (अमेरिका), अनिल नांदेडकर, डॉ. नितीन उपाध्याय (दुबई) व चिनार चितळे (न्यूझीलंड) सहभागी होणार आहेत. ११.३० वा. ट्रम्प ते पुतीन जागतिक अर्थव्यवस्था व भारत या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात गिरीश ठकार (अमेरिका), अनिल आंबेसकर, डॉ. किरण ठाकूर, सुरेश प्रभू व वैशाली पतंगे सहभाग घेणार आहेत. दुपारी २ वा. आधारवड मध्ये रानमाणूस प्रसाद गावडे, कमलाकात तारी व संदीप परव सहभाग घेतील. दु. ३. वा. क्रीडांगणावर चर्चासत्रात पद्मश्री उदय देशपांडे व पद्मश्री ब्रह्मानंद साखवाळकर सहभागी होतील.