Amit Patkar Statement | केंद्रीय अर्थसंकल्प गोवा विरोधी; काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकरांचा घणाघात

Amit Patkar Statement | केंद्रीय अर्थसंकल्प दूरदृष्टीहीन, जनविरोधी, निराशाजनक आणि गोवा विरोधी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
Amit Patkar
अमित पाटकर
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय अर्थसंकल्प दूरदृष्टीहीन, जनविरोधी, निराशाजनक आणि गोवा विरोधी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. पाटकर म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा अत्यंत निराशाजनक, दिशाहीन आणि पोकळ प्रयत्न आहे, जो भारतातील जनतेसमोरील गंभीर आर्थिक वास्तवाला सामोरे जाण्यात अपयशी ठरला आहे.

Amit Patkar
Subhash Phalesai | दिव्यांग सक्षमीकरणासाठी नवे मार्ग खुले : मंत्री सुभाष फळदेसाई

तो सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा देत नाही किंवा रोजगार निर्मितीसाठी विश्वासार्ह आराखडा नाही त्यामुळे गोव्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. पाटकर म्हणाले, अर्थसंकल्पातील अनेक घोषणा अस्पष्ट आहेत, निधीची कोणतीही स्पष्ट वचनबद्धता, वेळापत्रक किंवा अंमलबजावणी योजना नाहीत, त्यामुळे पारदर्शकता विश्वासार्हतेबद्दल आणि प्रश्न आहे. अर्थसंकल्पातील अनेक घोषणा अस्पष्ट आहेत, निधीची कोणतीही स्पष्ट वचनबद्धता, वेळापत्रक किंवा अंमलबजावणी त्यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबद्दल प्रश्न आहे.

अमित पाटकर योजना नाहीत, पाटकर म्हणाले, गोव्याची पर्यटन आधारित, किनारपट्टीची आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अर्थव्यवस्था असूनही, या अर्थसंकल्पात राज्यासाठी कोणतीही विशेष तरतूद केलेली नाही. गोव्याला पुन्हा एकदा सावत्र वागणूक मिळाली आहे. पर्यटन हा गोव्यातील रोजगाराचा सर्वात मोठा स्रोत आहे, तरीही अर्थसंकल्पात पर्यटन पुनरुज्जीवन, पायाभूत सुविधांसाठी पाठिंबा, वारसा संवर्धन किंवा गोव्यासाठी कोणतेही विशेष पॅकेज दिलेले नाही.

Amit Patkar
Goa Budget Reaction | राज्यातील उत्पादकांसाठी नारळ, काजू योजनेचा आधार

पाटकर म्हणाले, गोवा राज्य छोटे असले तरीही ते स्वतंत्र राज्य आहे. या राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरीव निधी देण्याची सर्वसमान्यांची मागणी होती. राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असल्याने व येत्या वर्षभरात विधानसभा निवडणुका असल्याने अर्थसंकल्पात गोव्यासाठी भरीव पॅकेज मिळेल, अशी आशा तमात गोमंतकीयांना होती. मात्र, केंद्र सरकारने गोमंतकीयांची पूर्ण निराशा केली असल्याचेही ते म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी आणि लोकांना जवळ प्रशासकीय यंत्रणा मिळावी, यासाठी कुशावती या तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, केंद्राने या तिसऱ्या जिल्ह्यासाठी कोणताही निधी दिलेला नाही. किंबहुना केंद्राकडून निधी मिळविण्यात राज्य सरकार कमी पडले आहे. राज्याची ताकद केंद्रात कमी पडल्यानेच अर्थसंकल्पात गोव्याचा विचार झाला नसल्याचेही ते म्हणाले. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पातून केंद्राला गोव्याचे काहीही पडलेले नाही, हे सिद्ध झाले आहे, असेही पाटकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news