Goa assembly elections| विधानसभा निवडणुकीत युगोडेपा, शिवसेनेची एन्ट्री

डिसेंबरमध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा : तृणमूल, राष्ट्रवादी पक्षाची हालचाल अद्यापही मंदच
Goa assembly elections
Goa assembly elections
Published on: 
Updated on: 

UGDP And Shiv Sena Entry In Goa Elections Eknath Shinde Convention

पणजी: विठ्ठल गावडे पारवाडकर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुख्य पक्ष वगळता इतर पक्षांपैकी युगोडेपा हा पक्ष आठ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) १४ जागा लढवणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डिसेंबरमध्ये गोव्यात येणार असून, शिवसेनेचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह युतीतील मगो पक्ष, त्याच बरोबर विरोधी काँग्रेस पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या पाच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मात्र, या पाच पक्षांव्यतिरिक्त गोव्यात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांच्यासह युगोडेपा या पक्षांची निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी व युगोडेपा या पक्षांचे आमदार यापूर्वी गोवा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यातील काहींनी मंत्रिपदेही भूषवली आहेत. मात्र, तरीही या पक्षांकडून निवडणुकीची मोठी तयारी दिसत नाही. युगोडेपाचे अध्यक्ष व माजी मंत्री मिकी पाशेको यांनी किमान आठ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राज्य अध्यक्ष माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा हे काँग्रेस आपल्या आघाडीत घेऊन किमान एक जागा देईल काय, याची प्रतीक्षा करत आहेत. शिवसेना व तृणमूलला अद्याप विधानसभेत खाते खोलायचे आहे.

जुझे फिलीप डिसोझा प्रत्येक पत्रकार परिषदेत काँग्रेसने आम्हाला युतीमध्ये घेऊन किमान दोन जागा द्याव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगतात. तृणमूल काँग्रेसने २०२२ च्या निवडणुकीमध्ये मगो पक्षासोबत युती करून तब्बल २३ जागा लढवल्या होत्या. मात्र, एकही उमेदवार जिंकला नव्हता. आता प. बंगालमध्ये या पक्षाची सत्ता गेलेली असल्याने गोवा व इतर राज्यांतील या पक्षाचे काम थंडावले आहे. या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले ट्रोजन डिमेलो हे कधीतरी पत्रकार परिषदा घेऊन या पक्षाचे अस्तित्व दाखवताना दिसतात.

Goa assembly elections
Goa Market Association Shutdown|नुकसानग्रस्तांना पाठिंब्यासाठी बाजार संघटनेकडून दुकाने बंद

शिवसेना १४ जागा लढवणार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोवा शिवसेनेचा डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यात मेळावा होणार आहे. शिवसेना राज्यातील १४ जागा लढवणार आहे. सद्यस्थितीत पणजीसह सांगे, पेडणे व फौंडा येथे कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. शिवसेनेचे काम तळागाळात सुरू आहे. भाजपसोबत युती करण्याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये सात विधानसभा प्रमुख नेमण्यात आले आहेत. त्यांच्या हाताखाली बूथ प्रमुख नेमण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेना राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांनी दिली.

Goa assembly elections
Goa|नुकसानग्रस्तांना नवीन दुकाने बांधून देणार

युगोडेपा आठ जागा लढवणार

युगोडेपातर्फे आठ जागा लढवण्यात येणार आहेत. यात नुवे, बाणावली, कुडतरी, दाबोळी, कुठ्ठाळी, ताळगाव, सांत आंद्रे, कुंभारजुवे या मतदारसंघांचा समावेश आहे. तेथे पक्षाचे काम सुरू आहे. आपण स्वतः बाणावलीत उभा राहणार आहे, असे मिकी पाशेको यांचे म्हणणे आहे. भ्रष्टाचाराचे आरोप नसलेले किंवा गुन्हेगारी आरोप नसलेले माजी आमदार पक्षामध्ये आले तर त्यांचे आम्ही स्वागत करू. सध्याच्या घडीला १३ वकील आमच्या पक्षामध्ये आहेत. त्यातील काही उमेदवारही असतील, अशी माहिती युगोडेपा मिकी पाशेको यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.