Goa|नुकसानग्रस्तांना नवीन दुकाने बांधून देणार

वास्को अग्निकांडप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

CM Pramod Sawant Assures New Shops For Vasco Fire Victims

पणजी : वास्को येथील संडे मार्केटमध्ये जी दुकाने जळून खाक झाली आहेत, त्यांना नवीन दुकाने बांधून दिली जातील. त्यापूर्वी या जागी पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

डॉ. प्रमोद सावंत दुकानदारांचे योग्य पत्रकारांनी पणजीत शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर डॉ. सावंत यांना वास्को मार्केटच्या आग दुर्घटनेनंतर दुकानदारांना सरकार काय सुविधा देणार, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गुरुवारी अग्निशामक दलाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी व दुकानदाराचे प्रतिनिधी यांची महत्त्वाची बैठक झाली. ज्यात आपण आभासी पद्धतीने सहभागी झालो. बैठकीत ज्या दुकानदारांची दुकाने जळालेले आहेत त्यांची त्वरित यादी करून त्यांना लवकरात लवकरात आर्थिक मदत प्रदान करण्यावर भर देण्याचे ठरले. त्याचबरोबर योग्य जागी त्यांचे पुनर्वसन करणे, मार्केटची इमारत नव्याने बांधणे हेही ठरले आहे. आगीची घटना कशी घडली, त्याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले असून दुकानदारांप्रती सरकारची सहानभुती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारने तीन प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. त्यामध्ये सर्व बाधित विक्रेत्यांचा तपशील गोळा करणे आणि प्राथमिक आर्थिक मदतीला गती देणे, घटनास्थळ निश्चित करणे आणि मार्केटच्या पुनर्बाधणीला गती देणे, तसेच आग कशी लागली आणि प्रतिसादात काही विलंब झाला होता काय, याची सविस्तर चौकशी करणे. या चौकशीत अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या भूमिकेसह विविध विभागांमधील समन्वयाचाही आढावा घेतला जाईल, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

महसूल सचिव चौकशी करणार

वास्को येथे २८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या घटनेची तथ्यशोधन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल सचिवांना या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी सर्वसमावेशक अहवाल सात दिवसांच्या आत सरकारला सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या चौकशीत संबंधित यंत्रणांची आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी कितपत होती, याचा तपास केला जाणार आहे. तसेच अग्निशमन दलाची पायाभूत सुविधा, उपलब्ध उपकरणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा पुरेशी व कार्यक्षम होती का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.

CM Pramod Sawant
Goa Vasco Fire|वास्को आग दुर्घटनेची तथ्यशोधन चौकशी

उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांची बैठक

मुरगाव पालिकेच्या मॉडर्न मार्केटमध्ये बुधवारी आग लागून खाक झालेल्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी मुरगावचे उपजिल्हाधिकारी व मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी यांची बैठक झाली. मार्केटमधील १०७ दुर्घटनाग्रस्त व्यावसायिकांनी आपल्याला नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत. पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी १०७ नुकसान झालेल्यांना एक-दोन दिवसात पालिकेतर्फे व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेले कागदपत्र सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. यासाठी मुरगाव पालिका शनिवार व रविवार खुली राहणार, असे मुख्याधिकारी नाईक यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Goa|काँग्रेसला झालेय नाकापेक्षा मोती जड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.