

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्याने ही कारवाई करण्यात पणजी शहरातील दोन स्पा आणि मसाज पार्लरवर प्रशासनाने संयुक्त तपासणी धडक मोहीम राबवत सीलची कारवाई केली आहे. आवश्यक आल्याची माहिती समोर आली आहे.
पणजीतील सर्व स्पा व मसाज पार्लरची तपासणी मोहीम पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पणजी महसूल विभाग, महापालिका, आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे हे छापे टाकले. तपासणीदरम्यान आस्थापनांकडे अनेक आवश्यक संबंधित परवान्यांचा अभाव असल्याचे उघड झाले.
हे स्पा आणि मसाज पार्लर आरोग्य विभागाचा परवाना, अग्निसुरक्षा मंजुरी, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी तसेच महापालिकेचा व्यापार परवाना नसतानाही सुरू होते. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीरपणे चालणाऱ्या अशा व्यवसायांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.