Goa Chemist Strike | गोव्यात केमिस्टचा कडकडीत बंद! ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात राज्यातील दुकाने दिवसभर कुलूपबंद

Goa Chemist Strike | नागरिकांना करावा लागला अडचणींचा सामना
Chemist Strike
Chemist Strike
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

देशात मोठ्या प्रमाणात ई पोर्टलद्वारे होत असलेल्या औषध विक्रीच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी फार्मसी व औषधालय बंद गोव्यातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील इस्पितळातील फार्मसी व जनऔषधी केंद्रे वगळता बहुतांश फार्मसी दिवसभर बंद होत्या. या बंदमुळे अनेक भागांत औषध खरेदीसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. बुधवारी पुकारलेला देशव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप देशभरातील औषध विक्रेत्यांनी (केमिस्टस् आणि ड्रगिस्टस्नी) यशस्वीरीत्या पाळला.

Chemist Strike
Nashik Ozar Airport Expansion | ओझर विमानतळाच्या विस्तारित बांधकामास मंजुरी

औषधांची सुरू असलेली बेकायदेशीर आणि अनियंत्रित ऑनलाईन विक्री, त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर आणि लाखो लहान औषध विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहावर होणारे गंभीर परिणाम, या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला. या बंदमुळे इस्पितळात तसेच आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या अनेक रुग्णांचे हाल झाले. त्यांना औषधी खरेदीसाठी इस्पितळातील फार्मसींकडे धाव घेण्याची वेळ आली.

Chemist Strike
Nashik Onion Price Drop | 'नाफेड'पेक्षा खुल्या बाजारात 400 रुपये जास्त भाव; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दौऱ्यात धक्कादायक वास्तव उघड

फार्मेसिस्ट व औषध विक्रेत्यांनी हा बंद रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व औषध विक्रीतील नियमबाह्य व्यवहाराविरोधातील लढा असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑनलाईन पद्धतीने होणारी औषध विक्री ही आरोग्यदृष्ट्या समाजासाठी घातक आहे. काही फार्मसी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय घरपोच औषधे पोहोचवत आहेत व सहज उपलब्ध होत आहेत. रुग्णांना ही औषधे घरपोच मिळत असली, तरी त्यामध्येही धोका व औषधांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ई पोर्टलद्वारे देशभरात होणाऱ्या बेकायदा औषध विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी गोवा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे सरचिटणीस प्रसाद तांबा यांनी केली आहे.

अवाजवी सवलतींचे धोरण बंद करा...

औषधांची बेकायदेशीर आणि अनियंत्रित ऑनलाईन विक्री, वैध आणि प्रमाणित वैद्यकीय चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) औषधांची विक्री आणि घरपोच वितरण, ऑनलाईन औषध विक्री मंचांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींचे स्पर्धात्मक धोरण बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news