Goafest 2026 | दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या जाहिरात महोत्सवाचा गोव्यात शानदार प्रारंभ; 'गोवाफेस्ट 2026' ला देश-विदेशातून गर्दी

Goafest 2026 | 'रिसेट फॉर ग्रोथ' या संकल्पनेवर होणार मंथन
Goafest 2026
Goafest 2026
Published on
Updated on

पणजी : 'अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया' (AAAI) आणि 'द अॅडव्हर्टायझिंग क्लब'तर्फे संयुक्तपणे आयोजित 'गोवाफेस्ट 2026' या दक्षिण आशियातील आघाडीच्या जाहिरात, माध्यम आणि विपणन क्षेत्रातील महोत्सवाचा शानदार प्रारंभ झाला आहे.

Goafest 2026
Nashik Election 2026 | सिंहस्थ, पावसाळापूर्व कामांना आचारसंहितेचा बसला फटका

या प्रतिष्ठेच्या महोत्सवाचे हे 19 वे वर्ष असून, २० ते २२ मे २०२६ दरम्यान 'ताज सिदाद दी गोवा होरायझन' येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना 'रिसेट फॉर ग्रोथ' अशी आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वाढते आक्रमण, बदलती ग्राहक शैली, डेटा मालकीच्या चिंता, बदलत्या माध्यम सवयी आणि मोजता येण्याजोग्या व्यावसायिक परिणामांची मागणी या आव्हानात्मक काळात जाहिरात व माध्यम उद्योगाने स्वतःला कसे पुनरुज्ञ्जीवित करावे, यावर येथे सखोल मंथन होणार आहे. या परिषदेत मोहित जोशी, जयदीप गांधी, श्रीनिवासन स्वामी, अजय काकर, अमितेश राव आणि अनुप्रिया आचार्य यांसारखे दिग्गज मार्गदर्शन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news