

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी १०० कोटी रुपये खर्च करून शंभर खाटांचे नवीन तुये हॉस्पिटल हे बांबोळी हॉस्पिटलला लिंक करण्याच्या दृष्टिकोनातून उभारले होते. ते हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटललाच लिंक करावे.
नवीन इमारतीत तुयेचे सामुदायिक आरोग्य केंद्र स्थलांतरित केल्यास आमचा तीव्र विरोध असेल त्यासाठी ११ जानेवारीपासून साखळी धरणे आंदोलन व १६ जानेवारी रोजी मशाल मिरवणूक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लेखी निवेदन देऊन त्यांनी दिलेले.
आश्वासन पाळावे याचे स्मरण करण्यासाठी त्यांना निवेदन देण्याचा निर्णय नुकताच तुये हॉस्पिटल कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तुये हॉस्पिटल कृती समितीची बैठक तुये परिसरात देवेंद्र प्रभुदेसाई अॅड. प्रसाद शहापूरकर जॉर्ज लोबो, व्यंकटेश नाईक, तुळशीदास राऊत व जागृत २२ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सरकारने जर नवीन हॉस्पिटल इमारतीमध्ये तुये येथे जुने हॉस्पिटल स्थलांतरित केल्यास आमचा तीव्र विरोध असणार आहे आणि त्यासाठी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ११ जानेवारीपासून साखळी धरणे आंदोलन याची सुरुवात करण्यात येणार आहे.
शिवाय शुक्रवार दि. ९ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात येईल. तुये हॉस्पिटल नागरिक कृती समितीच्या ज्या मागण्या आहेत. त्या मागण्यांचे स्मरण करणार निवेदन, शिवाय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलेले आश्वासन त्यांना आठवण करून देण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
तुये हॉस्पिटल कृती समितीने पूर्ण पेडणे तालुक्यात पंचायत पातळीवर जनजागृती करून हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक करण्यासाठी सरकारवर कशा पद्धतीचा दबाव घालावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
15 रोजी मशाल मिरवणूक
सरकारने जर मागण्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मान्य केल्या गेल्या नाही तर असंख्य नागरिकास सोबत गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी आयटीआय तुये ते नवीन हॉस्पिटल इमारतपर्यंत भव्य मशाल मिरवणूक काढण्याचा निर्णय तुये हॉस्पिटल कृती समितीने घेतला आहे.