Goa Travel Agents Meet 2026 | संतुलित पर्यटन विकासावर आमचा भर

Goa Travel Agents Meet 2026 | मंत्री रोहन खंवटे : ट्रॅव्हल एजंटस् मीटने गोवा पर्यटनाचे ट्रॅव्हल ट्रेडसोबतचे भागीदारी संबंध अधिक मजबूत
Goa Travel
Goa Travel
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

'ट्रॅव्हल एजंटस् हे गोव्याच्या पर्यटन विकासाच्या प्रवासातील आमचे दीर्घकालीन भागीदार आहेत. समुद्रकिनाऱ्यांपलीकडे विविध अनुभवांवर आधारित गुणवत्तापूर्ण पर्यटनाला प्रोत्साहन देताना ट्रॅव्हल ट्रेडसोबतचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Goa Travel
Vasco Carnival 2026 | सामाजिक, पर्यावरणविषयक चित्ररथ लक्षवेधी

स्थानिक समुदायांना लाभ होईल, रोजगार वाढेल आणि पर्यटकांचे समाधान वाढेल अशा संतुलित पर्यटन विकासावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले. गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी), गोवा सरकार, यांनी ट्रॅव्हल एजंटस् मीट २०२६ आयोजित केली.

Goa Travel
Goa News | कोरीव चिन्हांतून उलगडतील इतिहासाच्या पाऊलखुणा

या बैठकीत ट्रॅव्हल आणि पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचे घटक एकत्र आले आणि गोव्याला विविध अनुभवांनी समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य वाढवणे आणि धोरणे ठरवणे यावर भर देण्यात आला.

या कार्यक्रमात मंत्री रोहन खंवटे, जीटीडीसीचे अध्यक्ष केदार नाईक, व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गॅविन डायस, सचिन गोरे, लक्ष्मीकांत वायंगणकर, कपिल पैंगीणकर आणि उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात ५५ ट्रॅव्हल एजंटस्, ओटीए आणि एनटीएस ऑपरेटर्स तसेच गोव्याच्या ट्रॅव्हल ट्रेडमधील इतर भागधारक सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news