Tivim Underground Power Cable | भूमिगत वीजवाहिनीमुळे अखंडित वीजपुरवठा

Tivim Underground Power Cable | आमदार दिलायला लोबो : शिवोली मतदारसंघात वीजवाहिनीच्या कामाचे उद्घाटन
Tivim Underground Power Cable
Tivim Underground Power CableAI Image
Published on: 
Updated on: 

हणजूण (पुढारी वृत्तसेवा): वीजवाहिनी भूमिगत केबल यंत्रणेच्या कामामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून, पावसाळ्यात तसेच खराब हवामानामुळे वीजपुरवठात निर्माण होणारे व्यत्यय कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे नागरिकांना अधिक विश्वासार्ह आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होईल, असे प्रतिपादन आमदार दिलायला लोबो यांनी केले.

Tivim Underground Power Cable
RGP President Shavina Shirodkar | अजय खोलकर यांच्याविरोधात हणजूण पोलिसात तक्रार

शिवोली मतदारसंघासाठी आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो यांच्या हस्ते टेंबी ग्राउंड ते बॉबीबार जंक्शनपर्यंतच्या ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचे भूमिगत केबल यंत्रणेत रूपांतर करण्याच्या कामाची पायाभरणी करण्यात आली.

३३/११ केव्ही हणजूण वीज उपकेंद्रातून येणाऱ्या टेंबी फीडरच्या काही भागातील सध्या अस्तित्वात असलेल्या ओव्हरहेड ११ केव्ही वीजवाहिनीचे भूमिगत केबल प्रणालीमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. हे काम वीज खात्याच्या उपविभाग क्रमांक २, विभाग क्रमांक १७, मापुसा यांच्या कार्यक्षेत्रात राबवण्यात येत आहे.

Tivim Underground Power Cable
Anjuna Police Fraud Case | 4.37 कोटींची आर्थिक फसवणूक; हणजूण पोलिसांकडून 1.22 कोटींची मालमत्ता जप्त!

शिवोलीच्या विकासासाठी कटिबद्ध

शिवोली मतदारसंघातील पायाभूत सुविधांचे आधुनिकनीकरण करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शिवोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुरक्षित आणि आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावर आपला भर राहणार असल्याचे आमदार लोबो यांनी नमूद केले. यावेळी हणजूण-कायसूव पंचायतचे सरपंच सुरेख गोवेकर तसेच पंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.