Anjuna Police Fraud Case | 4.37 कोटींची आर्थिक फसवणूक; हणजूण पोलिसांकडून 1.22 कोटींची मालमत्ता जप्त!

Anjuna Police Fraud Case | हणजूण पोलिसांची कारवाई ; दिल्लीतील घर, दागिन्यांसह दुचाकी घेतली ताब्यात
money
moneyPudhari
Published on
Updated on

हणजूण : पुढारी वृत्तसेवा

हणजूण पोलिसांनी ४.३७ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण कारवाई करत गुन्ह्यातून मिळवलेल्या सुमारे १.२२ कोटी रुपयांच्या जंगम व स्थावर मालमत्तेवर जप्ती आणली आहे. म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १०७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

money
Sadanand Shet Tanavade | "काँग्रेसने पेपरफुटी विधेयकाला पाठिंबा का दिला नाही?" खासदार सदानंद शेट तानावडे यांचा रोखठोक प्रश्न

हे प्रकरण हणजूण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७८/२०२५ शी संबंधित असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१४, ३१६(४), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसगाव येथील 'सुखा - द इंडियन प्लॅटर' उर्फ 'सुकून हॉस्पिटॅलिटी'चे मालक शिवकरण सिंग यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपी गुलशन कुमार सिंग याने रेस्टॉरंट व्यवस्थापक म्हणून काम करताना बिलिंग नोंदींमध्ये फेरफार करून कंपनीच्या निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. त्याने ही रक्कम स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये वळविल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे तक्रारदाराचे सुमारे ४.३७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस तपासात समोर आले.

उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांनी केलेल्या आर्थिक तपासात अपहार केलेल्या निधीचा मागोवा घेण्यात आला. या पैशातून स्थावर मालमत्ता खरेदी, राहते घर बांधणे, सोन्याचे दागिने खरेदी करणे तसेच कुटुंबीयांना रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ३१ जानेवारी २०२६ रोजी म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात बीएनएसएसच्या कलम १०७ अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा अर्ज मंजूर करून गुन्ह्यातून मिळवलेली जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

money
Goa Opposition Rift Vijay Sardesai | विरोधात पुन्हा विसंवाद! विजय सरदेसाईंना निमंत्रणच नाही, गोवा फॉरवर्ड अध्यक्षांची तीव्र नाराजी

न्यायालयाच्या आदेशानुसार हणजूण पोलिसांच्या तपास पथकाने दिल्ली येथे जाऊन जप्तीची कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे संबंधित मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापासून प्रतिबंध करण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईत २०२४ मध्ये बांधण्यात आलेले सुमारे १.२० कोटी रुपये किमतीचे घर, तसेच २.५० लाख रुपये किमतीची दुचाकी आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील नाईक करीत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news