RGP President Shavina Shirodkar | अजय खोलकर यांच्याविरोधात हणजूण पोलिसात तक्रार

RGP President Shavina Shirodkar | आरजीपी अध्यक्षा शविना शिरोडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण
RGP President Shavina Shirodkar
RGP President Shavina Shirodkar
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) अध्यक्षा शविना शिरोडकर यांनी आपल्याविरोधात कथित अपमानास्पद आणि अवमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अजय खोलकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

RGP President Shavina Shirodkar
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

खोलकर यांनी केलेल्या कथित वक्तव्याबद्दल शिरोडकर यांनी लेखी, तसेच जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देत दिलेल्या मुदतीत माफी न मागितल्याने ही तक्रार दाखल केल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.

आरजीपीच्या काही कार्यकर्त्यांनी याच प्रकरणी हणजूण पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. खोलकर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या त्यांच्या त्या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण केले.

RGP President Shavina Shirodkar
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

शिवोली आरजीपी पदाधिकाऱ्यांनी केली तक्रार

आरजीपीचे बडतर्फ नेते अजय खोलकर यांनी महिलांसंदर्भात अपशब्द वापरून महिलांची बदनामी केल्याप्रकरणी शिवोली मतदारसंघातील रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध हणजूण पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना आरजीपीच्या महिला अध्यक्षा संदर्भात त्यांनी टिप्पणी केली होती. महिलांवर केलेल्या या टिप्पणीसंदर्भात खोलकर यांनी जाहीर माफी मागावी. तसेच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.