Goa crime | पूर्ववैमनस्यातून पुतण्यांनीच मानेवर कुन्हाड घालून केली चुलत काकाची हत्या

एक फरार; एक ताब्यात
murder
murder file photo
Published on
Updated on

फोंडा : खाजोर्डा बोरी येथे - पूर्ववैमनस्यातून एकाची मानेवर कुन्हाड घालून हत्या करण्याचा प्रकार घडला. रविवारी (दि.३) संध्याकाळी ५.४५ च्या दरम्यान ही घटना घडली. मयत इसमाचे नाव दीपक राया नाईक (वय ५८) असे आहे.

murder
Goa Kepe 108 ambulance service down |केपेतील १०८ रुग्णवाहिका तीन दिवसांपासून बंद

खाजोर्डा येथे दीपक नाईक याच्या अंगणातच ही घटना घडली. हल्लेखोर दोघे भाऊ असून गौरेश कुशन नाईक हा हत्यारासहीत फरार झाला असून त्याचा भाऊ साईदीप कुशन नाईक याला फोंडा पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांपूर्वी दीपक नाईक व कुशन नाईक यांच्यात पायवाटेवरून दोन्ही नाईक कुटुंबियांत वादावादी झाली होती. दीपक नाईक याने आपल्या घराचे छत बदलताना कौलांच्या जागी पत्रे घातले होते. पत्रे घालताना कौले काढून वाटेच्या कडेला ठेवण्यात आली होती. ती कौले दीपक नाईक दुसरीकडे ठेवत होता. या कौलांवरून गौरेश आणि साईदीप यांनी भांडण उकरून काढले.

murder
Goa|मिनी बस-जीप धडकेत १६ जण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news