पणजी : ‘अग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी’ वर आधारित टपालपत्र ; देशातील पहिला प्रयोग

पणजी : ‘अग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी’ वर आधारित टपालपत्र ; देशातील पहिला प्रयोग

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जागतिक वन्यदिनानिमित्त गोवा टपाल विभागातर्फे देशात सर्वप्रथम 'अग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी' (एआर) तंत्रज्ञानावर आधारित टपालपत्राचे आणि पोस्टमार्कचे अनावरण करण्यात आले. टपालपत्रावर राज्य फुलपाखरू असणार्‍या 'मलबार ट्री निम्फ'चे छायाचित्र आहे. छायाचित्रावर मोबाईल कॅमेरा धरल्यास हे फुलपाखरू पंख फडकवू लागते आणि जणू ते जिवंत असल्याचा भास होतो.

'एआर' तंत्रज्ञान खर्‍या जगातील गोष्टी अधिक सुधारित करून दाखवते किंवा नसलेल्या गोष्टी असल्याचा भास निर्माण करते. याबाबत गोवा टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे यांनी सांगितले की, देशात टपाल खात्यातर्फे असा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला आहे. लान्स डिमेलो यांनी सांगितले की, सर्वप्रथम युनिटी संगणक प्रणालीद्वारे फुलपाखराचे अ‍ॅनिमेशन तयार केले. त्यानंतर आणखी एक अ‍ॅप वापरून त्याला 'एआर' तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य वृक्ष, प्राणी, पक्षी आणि फुलपाखरावर विशेष टपाल पाकिटाचे आणि रद्द पोस्टमार्कचेही अनावरण करण्यात आले. यावेळी पोस्टमास्टर जनरल एसएफएच रिझवी, वरिष्ठ अधिक्षक डॉ. सुधीर जाखेरे, राज्याचे अतिरिक्‍त मुख्य वनसंरक्षक संतोष कुमार, मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार, डॉ. रमेश कुमार उपस्थित होते.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news