Karwar River Accident| कारवार हादरले! नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 7 महिलांसह एकाच कुटुंबातील 10 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Karwar River Accident| चौघांना वाचवण्यात यश : शिंपले जमा करण्यासाठी उतरल्यावर दुर्घटना
Karwar River Accident| कारवार हादरले! नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 7 महिलांसह एकाच कुटुंबातील 10 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Pudhari
Published on
Updated on

कारवार : पुढारी वृत्तसेवा

नदीतील शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या मच्छीमार कुटुंबातील सात महिलांसह दहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर चौघांना वाचवण्यात आले. कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात थट्टेहक्कल गावजवळ वेंकटपुरा नदीत रविवारी ही दुर्घटना घडली.

Karwar River Accident| कारवार हादरले! नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 7 महिलांसह एकाच कुटुंबातील 10 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Nashik News : गोरक्षकांच्या पाठलागाने भांडाफोड, कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गाईंची सुटका!

उमेश नायक (वय 30), लक्ष्मी महादेव नायक (42), लक्ष्मी नायक (30), लक्ष्मी अन्नप्पा नायक (60), लक्ष्मी शिवराम नायक (49), ज्योती नागप्पा नायक (34), मालती नायक (34), मास्तम्मा नायक (38) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण भटकळ येथील शिराली गावचे रहिवासी होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, वेंकटपुरा नदी थोट्टेहोक्कल गावाजवळ समुद्राला मिळते. समुद्राला ओहोटी असताना नदीचे मुख उघडे पडते. त्यावेळी शिंपले सापडतात. ते जमा करण्यासाठी रविवारी सकाळी 11 च्या सुमारास नायक कुटुंबीय नदीत उतरले होते.

Karwar River Accident| कारवार हादरले! नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 7 महिलांसह एकाच कुटुंबातील 10 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Goa Pre Monsoon Update | राज्याला मान्सूनपूर्वचा तडाखा

मात्र समुद्राला भरती आली आणि पाणी अचानक वाढले. नदीत दलदल होती. त्यामुळे वेळेत नायक कुटुंबीयांना बाहेर पडता आले नाही. यात 10 जणांचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती कारवार पोलिस अधीक्षक दीपन एम. एन. यांनी दिली.

पोट भरणारे शिंपलेच...

स्थानिक भाषेत कप्पेचिप्पा म्हणून ओळखले जाणारे शिंपले हा माशांचा प्रकार असून, ते खाल्ले जातात. ते काढण्यासाठी पाण्याची पातळी कमी असताना स्थानिक लोक बोटीने नदी आणि समुद्रात जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news