Goa Pre Monsoon Update | राज्याला मान्सूनपूर्वचा तडाखा

Goa Pre Monsoon Update | ठिकठिकाणी बरसला पाऊस; विजेचे खांब, भिंत, झाडांची पडझड
Monsoon Weather Update
Monsoon update | आनंदवार्ता! मान्सून 48 तासांत अंदमानातFile Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा राज्यात रविवारी पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे मान्सून लवक-रच गोव्यात दाखल होत असल्याची जणू वर्दीच दिली. मात्र, राज्यात ठिक-ठिकाणी झाडांची पडझड झाली असून हणजूणे येथे विजेचे खांब कलंडले, तर खांडेपार येथे संरक्षक भिंत कोसळली.

Monsoon Weather Update
Nashik Municipal Corporation | पावसाळापूर्व कामांसाठी आपत्कालीन पथके

दक्षिण गोव्यातील गिरदोली, फातोर्डा, बाणावली परिसरातही झाडांची पडझड झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने ३० मे रोजी मान्सून गोव्यात येईल, असा अंदाज वर्तविला आहे. पावसामुळे कडक उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळाला. पहाटे पासून सुरू असलेला दुपारपर्यंत अधूनमधून सुरू होता.

पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. खांडेपार येथे एका शाळेची संरक्षक भिंत कोसळली, तर हणजूण येथे जोरदार वाऱ्यामुळे विजेचे दोन खांब वाकले. काही ठिकाणी झाडे, फांद्या कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अग्निशामक दलाचे जवान, स्थानिकांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Monsoon Weather Update
Nashik News : गोरक्षकांच्या पाठलागाने भांडाफोड, कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गाईंची सुटका!

आजही पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोमवारीही राज्यात अशीच पावसाची स्थिती कायम राहण्याची दाट शक्यता आहे. यंदाचा मान्सून वेळेपूर्वी म्हणजेच पाच दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज इवामान खात्याने वर्तवला याचा शेट परिणाम गोव्यावर होणार आहे.

पावसाचा जोर ५ तालुक्यांत अधिक

ज्यातील मुरगाव, सासष्टी, काणकोण, तिसवाडी आणि बार्देश या तालुक्यां-मध्ये पावसाचा जोर अधिक होता. सखल भागांत काही प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन तात्पुरते विस्कळीत झाले होते. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या गोवावासीयांनी आल्हाददायक वातावरणाचे स्वागत केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news