Pernem School | शाळेत जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईला शिक्षकांनी खोलीत कोंडले; पेडणेमधील प्रकाराने खळबळ

Pernem School | क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण, सहा शिक्षकाविरुद्ध गुन्हा
School
SchoolPudhari
Published on: 
Updated on: 

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
लांब वहीऐवजी छोटी वही आणल्याच्या कारणावरून १४ वर्षीय विद्यार्थाला थप्पड मारून दुखापत केल्याचा, तसेच याबाबत शाळेच्या समाज माध्यमाच्या गटावर जाब विचारणाऱ्या त्याच्या आईला खोलीत कोंडल्याचा प्रकार हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात घडला. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी सहा शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, या प्रकाराने राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

School
Pernem Crime News | पेडणे तालुक्यात खळबळ; शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची टोकाची भूमिका

पूजा बाणकर, प्रसाद शेटगावकर, माधवी कुंभार, सोनाली सुभाजी, अंकिता आणि साहिल अशी संशयितांची नावे आहेत. विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटी वही आणल्याच्या कारणावरून शिक्षिका पूजा बाणकर यांनी विद्यार्थाला थप्पड लगावली. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकाराबाबत आईने शाळेच्या समाज माध्यमाच्या गटावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर तिला शाळेत बोलावण्यात आले. शाळेत आल्यानंतर सहा शिक्षकांनी संगनमताने आईला नियंत्रण कक्षात बेकायदेशीररीत्या कोंडून ठेवले. खोलीला आतून आणि बाहेरून कडी लावण्यात आल्याचे, तसेच माधवी कुंभार यांनी मारहाण करण्यासाठी धावून जात शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

School
Russian Woman Illegal Stay | पेडणे तालुक्यातील कोरगावमध्ये रशियन महिलेचे बेकायदेशीर वास्तव्य; पोलिसांकडून कारवाई

संशयितांमध्ये चार शिक्षकांचा समावेश

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११५ (२), १२७ (२), १३१ आणि ३५२ सहवाचित कलम ३ (५), तसेच गोवा बाल अधिनियम, २००३ मधील कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्यात आलेल्यांपैकी चार शिक्षकांचा समावेश असून दोघे शिक्षक आहेत. याचा अधिक तपास मांद्रे पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news