Dr Nirvan Bharat Murder Case | डॉक्टरच्या खूनप्रकरणी संशयिताला तीन वर्षांनी जामीन

Dr Nirvan Bharat Murder Case | बेताळभाटी येथील डॉक्टर निर्वाण भरत यांच्या खून प्रकरणी संशयित शाहिद खान याला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
Jambhli murder case |
Jambhli murder case | जांभळीतील खूनप्रकरणी मुख्य संशयितास अटक(File Photo)
Published on
Updated on

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

बेताळभाटी येथील डॉक्टर निर्वाण भरत यांच्या खून प्रकरणी संशयित शाहिद खान याला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयित ३ वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत होता. न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. संशयित शाहिद हा मूळ मुंबई येथील आहे.

Jambhli murder case |
Crime News | कशासाठी? गर्लफ्रेंडसाठी!

डॉ. भरत हे नुवे येथील एका इस्पितळात प्रॅक्टिस करीत होते. ते नागवाडो बेताळभाटी येथे फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता व त्यांचा मृतदेह खाटेच्या कप्प्यात लपवून ठेवण्यात आला होता. २०२३ साली फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. मागाहून कोलवा पोलिसांनी या खून प्रकरणी सिमांचल परिदा, आलोक सिंग, नागेन्द्र कुमार व शाहिद खान या सर्वांना राजस्थान येथे पकडले होते.

पैशांच्या हव्यासापोटी हा कट रचून डॉक्टरांचे पैसे, पतपेढीचे ओळखपत्र आणि वाहन चोरून संशयितांनी पळ काढला होता. यातील आलोक सिंग याला उच्च न्यायालयाने आधीच जामीन मंजूर केला आहे. शाहिद याची या खून प्रकरणात भूमिकाही आलोक सिंगसारखीच असल्याने त्याला समानतेच्या तत्त्वावर जामीन देण्यात आला.

Jambhli murder case |
Lohagad Case: लोहगडावर धक्कादायक खून उघड; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलून संपवल्याचा आरोप

शाहिद हा ३ वर्षांपासून तुरुंगात आहे. या खटल्यात ५० साक्षीदार तपासायचे असताना अजून पहिल्या साक्षीदाराची साक्षही पूर्ण झालेली नाही. या गुन्ह्यात परिदाविरुद्ध कोणताही थेट प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही.

सीसीटीव्हीचे पुरावे अपूर्ण असून त्याचा मुख्य तांत्रिक डेटा रेकॉर्डवर नसल्याने तो कमकुवत पुरावा ठरला. गुन्हा गंभीर असला तरी संशयिताला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येत नाही. जलद गतीने खटला न चालणे हे संविधानातील वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असे न्यायालयाने आपल्या निवाड्यात स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news