

डिचोली : साखळी मतदारसंघातील सुर्ल देऊळवाडा सिद्धेश्वर नवदुर्गा देवस्थाना जवळ मंगळवारी सकाळी एक मोठे झाड वीज वाहिन्यांवर कोसळून दोन वीज खांब मोडून पडले. देवस्थानचे पुजारी गुरुदास वझे यांच्या पार्क करून ठेवलेल्या कारवर झाड कोसळून कारचे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज खांब मोडून पडल्याने वीज खात्याचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुर्ल येथे श्री सिद्वेश्वर देवस्थान मंदिराजवळ भले मोठे झाड कोसळून वीज वाहिन्यांवर पडले. त्यामुळे दोन वीज खांब मोडून पडले. त्यातील एक खांब जवळच राहणारे देवस्थान पुजारी गुरुदास वझे यांनी पार्क करून ठेवलेल्या कारवर पडला.
या घटनेत त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. देवळात जाण्याच्या पायवाटेवरच हे वीज खांब मोडून पडले. घटनास्थळी कोणी नव्हते म्हणून मोठा अनर्थ टळला, असे मत प्रशांत साधले यांनी व्यक्त केले.