Suhana Naik Arrest Ponda | सरकारी नोकरीच्या नावे गंडा; सुहाना नाईकला अटक

Suhana Naik Arrest Ponda | 18 लाखांचा चुना; फोंडा पोलिसांची कारवाई
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

सरकारी नोकरी देतो म्हणून तब्बल १८ लाख रुपयांचा चुना लावलेल्या भंडारवाडा-आमोणा येथील सुहाना सुजय नाईक (वय ३९) हिला काल (शुक्रवार) फोंडा पोलिसांनी अटक केली असून ६ दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे.

Arrested
Chandwad ACB Raid | चांदवड प्रशासन लाचखोरीने पोखरले! महिनाभरात 3 मोठे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

उसगाव भागातून आलेल्या तक्रारीनुसार सुहाना नाईक हिला अटक करण्यात आली आहे. आरोग्य खात्यात होमिओपॅथी डॉक्टर, वाहन चालक व कारकून अशा तीन जागांसाठी मिळून एकूण १८ लाख रुपये सुहाना नाईक हिने उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुहाना नाईक ही यापूर्वी आरोग्य खात्यात कंत्राटी कामावर होती.

या कामावेळी झालेल्या काही जणांच्या ओळखीचा फायदा उठवून तिने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. फोंडा पोलिसांनी संशयित सुहाना हिला ताब्यात घेऊन प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता तिला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Arrested
Onion Price Drop Nashik | कांद्याला 50 पैसे किलो दर! सटाणा बाजार समितीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; संताप अनावर

सुहानाचा इतर कुणाशी संपर्क होता काय, की तीच मास्टरमाईंड आहे याचा तपास फोंडा पोलिस करीत आहे. दरम्यान, २०२५ साली कॅश फॉर जॉब प्रकरण बरेच गाजले होते. त्यावेळी पूजा नाईक, दीपश्री गावस, श्रुती प्रभुगावकर व सुनिता पावसकर अशा चार जणींना फोंडा आणि म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली होती; त्यात आता सुहाना नाईक या पाचव्या संशयित आरोपीची भर पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news