

म्हापसा पुढारी वृत्तसेवा
म्हापसा येथील प्रसिद्ध अशा श्री देव बोडगेश्वराच्या ९१ व्या जत्रोत्सवाला दि. २ पासून सुरुवात झाली असून भक्तांच्या हाकेला पावणाऱ्या जागृत देवा च्या आशीर्वादासाठी सकाळपासून भक्तांची रिक्ष लागली होती. सकाळी मानकन्यांच्या दर्शनानंतर सर्व सामान्य नागरिकांनी श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेत आशीर्वाद पेहले.
शुक्रवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेटतानावडे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, उपसभापती तथा म्हापसाचे आमदार जोश्युआ डिसोझा, म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व जेठ अधिकारी (अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व इतर) व प्रतिष्ठित नागरिकांनी श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेतले.
शुक्रवारी रात्री सायंकाळी स्वर भगिनी हा भावगीत व भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात वैष्णची प्रभू व ममता प्रभू या गायिकांनी आपली कला पेश केरली. त्यांना हार्मोनियमवर नरेश नागवेकर, तबल्यावर दत्तराज चारी, पखवाज वर भावेश कळंगुटकर, मंजिरीवर प्रतीक गडेकर यांनी साथसंगत केली, तर या कार्यक्रमाचे निवेदन परेश नाईक यांनी केले आज भजन, गायन मैफलची मेजवानी देवस्थानतर्फे शनिवार दि. ३ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी १ वा. महप्रसाद होणार असून, सायंकाळी ५:३० वा. पांडुरंग राऊळ व साथी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
विठ्ठल शिरोडकर व प्रल्हाद गावस या गायक कलाकारांना संवादिनीवर अमोल गावस, तबल्यावर स्वप्निल राऊळ, पखवाज वर निशिकांत कळंगुटकर साथ संगत करणार आहेत. सायं. ७.३० वा. केतन गुस्वास साळगावकर प्रस्तुत 'फुलले रे क्षण माझे' हा भावगीत, भकीगीत, अभंग, चित्रपटगीत व नाट्य गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
यातील गायक कलाकार आहेत प्रणय मोहन पवार (मुंबई), समृद्ध सुरेश चौधरी, कल्पना दिलीप सायनेकर, माधवी मुरारी मडगावकर असून त्यांना तबला ढोलकी यतीन तळावलकर, सिथसायझर विष्णू शिरोडकर, ऑक्टोपॅड केतन गुरुदास साळगावकर, हँडसोनीक व डोलक अच्युत अवधूत चारी, गिटार रोहन नाईक साथसंगत करणार असून या कार्यक्रमाचे निवेदन श्रुती हजारे करणार आहेत.