Shirgaon Lairai Jatra 2026 Goa | 21 एप्रिलला भरणार लईराईची जत्रा! 10 एप्रिलपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांचे आदेश

Shirgaon Lairai Jatra 2026 Goa | आमदार प्रेमेंद्र शेट; लईराई जत्रोत्सव तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
Shirgaon Lairai Jatra 2026 Goa
Shirgaon Lairai Jatra 2026 Goa
Published on
Updated on

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. २१ एप्रिल रोजी होणाऱ्या या जत्रेच्या नियोजनासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी घटनास्थळी जाऊन पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

Shirgaon Lairai Jatra 2026 Goa
Goa Flight Cancellation 2026 |इराण-इस्रायल संघर्षामुळे गोव्याचे विमान उड्डाण 'ठप्प'; दाबोळी अ न् मोपा विमानतळावरून अनेक फ्लाईट्स रद्द

यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह पोलिस आणि विविध सरकारी खात्यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जत्रोत्सवाच्या अनुषंगाने असलेली प्रलंबित कामे १० एप्रिलपर्यंत पूर्ण करा, अशी सूचना आमदार शेट यांनी अधिकाऱ्यांना केली.

या महत्त्वपूर्ण बैठकीत गर्दी नियंत्रण धोरण, पोलिस तैनात करणे आणि तात्पुरत्या नियंत्रण कक्षाची स्थापना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जत्रेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Shirgaon Lairai Jatra 2026 Goa
India Census 2027 Schedule | आता कागद नाही, मोबाईल हवा! भारताची पहिली 'डिजिटल' जनगणना 16 एप्रिलपासून; पाहा पूर्ण वेळापत्रक

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांचे नियोजन, बॅरिकेडिंग आणि भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी विशेष पथदिव्यांची व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, पंचायत आणि अबकारी विभागासह अग्निशमन दलाच्या प्रतिनिधींना आपापल्या निर्धारित जबाबदाऱ्या तातडीने पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी प्रत्यक्ष आयोजनापूर्वी सर्व व्यवस्थांची पडताळणी करण्यासाठी एक मॉक ड्रिल घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर आणि वाहतूक शाखेचे पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाचा आराखडा सादर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news