India Census 2027 Schedule | आता कागद नाही, मोबाईल हवा! भारताची पहिली 'डिजिटल' जनगणना 16 एप्रिलपासून; पाहा पूर्ण वेळापत्रक

India Census 2027 Schedule | जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १६ एप्रिलपासून सुरू होत असून यामध्ये घरांची यादी आणि गृहगणना यांचा समावेश आहे.
India Census 2027
India Census 2027
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १६ एप्रिलपासून सुरू होत असून यामध्ये घरांची यादी आणि गृहगणना यांचा समावेश आहे. हा टप्पा १५ मे पर्यंत सुरू राहाणार आहेत. स्थिती, या मोहिमेंतर्गत कुटुंबांच्या घरांची आणि सोयीसुविधा मालमत्तेविषयी माहिती गोळा केली जाईल.

India Census 2027
Goa Mini Gas Cylinder Shortage | युद्धाची झळ गोव्यातील किचनला! गोव्यात मिनी सिलिंडरचा दुष्काळ! हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ

त्याआधी १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे रहिवाशांना प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाही सुरू होण्यापूर्वी डिजिटल पद्धतीने तपशील सादर करता येईल. जनगणना कायदा १९४८ आणि सुधारित जनगणना नियम, १९९० च्या तरतुदींनुसार जनगणना केली जात आहे. आगामी फेरीत डिजिटल पद्धतींचा अवलंब केला जाईल. त्यामुळे कागदपत्रांवर आधारित गणनेच्या पद्धतीत बदल होईल. लोकसंख्या गणनेचा समावेश असलेला दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये नियोजित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news