Molestation Case | भरदिवसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये तरुणीवर बळजबरी; संशयित मल्लीकार्जुनचा जामीन अर्ज फेटाळला

Molestation Case | तरुणीचा पाठलाग करून पाटो पणजी येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये तिच्यावर बळजबरी व विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या पर्यटक संशयित एम. मल्लीकार्जुन (वय ३५, रा. कर्नाटक) याचा मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला.
Goa High Court
Goa High CourtPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

तरुणीचा पाठलाग करून पाटो पणजी येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये तिच्यावर बळजबरी व विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या पर्यटक संशयित एम. मल्लीकार्जुन (वय ३५, रा. कर्नाटक) याचा मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला.

Goa High Court
Government Energy Policy India | ऊर्जा क्षेत्राच्या संकटाचा सामना करण्याची भारताची क्षमता

हे प्रकरण तरुणीचा विनयभंग करण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. तो बिगर गोमंतकीय आहे. संशयित न्यायालयीन कोठडीत आहे या एकाच कारणास्तव त्याला जामिनावर मुक्त करणे हा जामीन मंजूर करण्यासाठी पुरेसा आधार ठरू शकत नाही.

महत्वाच्या साक्षीदारांच्या जबानी अजून नोंद झालेल्या नाहीत. त्याला जामीन मिळाल्यास तो साक्षीदरांना आमिष किंवा धमकावण्याची शक्यता आहे. हे प्रकरण खूपच संवेदनशील असून त्याला जामीन मिळाल्यास पीडित महिला निश्चितच मानसिक आघात व भीतीखाली राहील.

Goa High Court
Goa Cyber Fraud Case | लंडनची 'ती' निघाली भामटी! लग्नाचं आमिष दाखवून कुडचडेतील व्यक्तीला ३.३५ लाखांना लुटलं

अशा परिस्थितीत जर संशयित न्यायालयीन कोठडीत असेल तर पीडिल महिलेला पुन्हा पूर्ववत व निर्भय स्थितीत आणणे शक्य होईल. साक्षीदारही देखील निर्भयपणे आपली जबानी न्यायालयात नोंदवू शकतील, असे निरीक्षण न्यायालयाने संशयिताला जामीन फेटाळताना केले आहे.

२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास संशयिताने पीडित तरुणीचा पाठलाग केला. ती पाटो येथील एका इमारतीत ऑफिसमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरली. तिच्या पाठोपाठ संशयितही लिफ्टमध्ये घुसला. कोणीही लिफ्टमध्ये नसल्याची संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news