

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
भारत बलाढ्य सागरी राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. हिंदी महासागर क्षेत्रामध्ये स्थिरता, सहकार्य व नियमाधारित व्यवस्था सुनिश्चित करण्यात भारताची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होत चालली असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. दरम्यान, भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास चेहरामोहराच बदलून टाकू, असा इशाराही त्यांनी नाव न घेता पाकिस्तानला दिला आहे. गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या दोन मालिकेतील पहिले व भारतीय तटरक्षक दलाचे सर्वात मोठे प्रदूषण नियंत्रण जहाज 'समुद्र प्रताप' भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामावून घेण्याच्या
सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार कॅ. विरिएतो फर्नांडिस, आमदार कृष्णा साळकर, संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी, गोवा 'समुद्र प्रताप' जहाजाचे प्रमुख व उपमहानिरीक्षक अशोककुमार भामा, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय, तसेच भारतीय तटरक्षक दलाचे व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'समुद्र प्रताप'कडे पाहिले असता सर्व काही स्पष्ट होते. ते जेव्हा लाटांवर स्वार होऊन पुढे जाईल, तेव्हा त्याच्याबरोबर देशाचा आत्मविश्वास पुढे जाणार आहे, नौदल, भारतीय तटरक्षक दलांची जहाजे भारताच्या सार्वभौमत्वाची तरंगती प्रतीके आहेत. जहाजे ही केवळ पोलाद, यंत्रसाम्रगी, तंत्रज्ञानाचे मिश्रण नसून, ती जनतेच्या विश्वासाची व सशस्त्र दलांच्या अपेक्षा व गरजांची प्रतीके आहेत.
ते म्हणाले, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता ही काही मजेची गोष्ट नाही, तर एक धोरणात्मक गरज आहे. संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, आम्हाला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
स्पर्धकांवर मात करण्यासाठी, जहाजांना अत्यानुधिक उपकरणे, एआयसक्षम देखभाल प्रणाली व सायबर सुरक्षित प्लॅटफॉर्मने सुसज्ज करणे हे शत्रूवर निर्णायक मात करण्यासाठी महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, २०४७ पर्यंत विकसित भारत व्हिजन साकार करण्यासाठी आम्हाला मेहनत व प्रतिबद्धतेबरोबर निरंतर प्रगती सुनिश्चित करावी लागेल.
भारतीय तटरक्षक दल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्यासमोरील आव्हाने लोकांना माहीत नाहीत. शोध व बचाव मोहीम, पर्यावरणाचे रक्षण, प्रदूषणाला आळा घालणे, मच्छीमारांचे व किनाऱ्याचे रक्षण करणे, तसेच इतर गोष्टींसाठी तटरक्षक दल नेहमी सज्ज असते. समुद्रातील संकटसमयी तटरक्षक दलाकडून नेहमी प्रथम प्रतिसाद मिळतो. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाचा इतर प्रगत देशांच्या श्रेणीमध्ये समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
महिलांना संरक्षण क्षेत्रामध्ये अधिक महत्त्व देणे, त्यांचे सशक्तीकरण करणे या गोष्टींकडे लक्ष देण्यात येत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. महिलांनी फक्त सपोर्टिंग भूमिका न बजावता त्यांनी फ्रंटलाईन भूमिका निभावावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ब्रजेशकुमार उपाध्याय यांनी गोवा शिपयार्डच्या कामगिरीचा व चढत्या आलेखाचा आढावा घेतला. भविष्यात आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियासारख्या उपक्रमांना अधिकाधिक गती मिळविण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. महासंचालक परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला. भारतीय तटरक्षक दलाचे काम आता किनारपट्टीपुरते मर्यादित नसून, त्याची व्याप्ती वाढली असल्याचे ते म्हणाले.
भविष्यातील जहाजांमध्ये ९० टक्के
स्वदेशी उपकरणे आत्मनिर्भर हा नारा नसून, कार्यशैली बनली आहे. येणाऱ्या काळात विविध शिपयार्डमध्ये बांधण्यात येणारी जहाजे ही ९० टक्के स्वदेशी उपकरणे, साहित्याची असतील, असे मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी गोवा शिपयार्डच्या कामगिरी, योगदानाचे कौतुक करतानाच गोवा शिपयार्ड व इतर शिपयार्डानी भविष्यात भारताची जागतिक विश्वासार्हता अधिक मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही केले.
जहाजावर १४ अधिकारी, ११५ कर्मचारी
'समुद्र प्रताप' जहाज कोची येथे भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयाच्या देखरेखीखाली तैनात करण्यात येणार आहे. हे जहाज भारतीय सागरी हिताचे रक्षण, प्रक्षण प्रतिसाद, सागरी देखरेख व इतर कामे करील. उपमहानिरीक्षक अशोककुमार भामा यांच्या नेतृत्वाखालील या जहाजावर १४ अधिकारी व ११५ कर्मचारी असतील. या जहाजात दोन महिला अधिकाऱ्यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे.
जहाजाची वैशिष्ट्ये... ११४.५ मीटर लांबीच्या
या जहाजात ६० टक्के स्वदेशी घटकांचा समावेश भारतीय तटरक्षक
दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे हे प्रदूषण नियंत्रण जहाज जहाजाचे वजन
४,२०० टन आहे आणि त्याचा वेग २२ नॉटस्पेक्षा जास्त