Goa Agriculture News | सडये-शिवोलीतील 'ती' शेतजमीन येणार लागवडीखाली

Goa Agriculture News | 50 हजार चौरस मीटर क्षेत्र; कम्युनिटी फार्मिंग अंतर्गत निधी मंजूर
Goa Agriculture News
Goa Agriculture News
Published on: 
Updated on: 

शिवोली : पुढारी वृत्तसेवा
कम्युनिटी फार्मिंग योजनेअंतर्गत राज्य सरकारने निधी मंजूर केल्यामुळे सडये-शिवोली परिसरातील सुमारे ५० हजार चौरस मीटर शेतजमीन पुन्हा लागवडीखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचा लाभ ३३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून पडिक असलेल्या या जमिनीवर आता पुन्हा शेती फुलणार असून, परिसरातील कृषी उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Goa Agriculture News
Siolim Primary Health Center | शिवोली आरोग्य केंद्राची दुरवस्था; 7 कोटींची नवी इमारत पण एक्स-रे मशीन गायब!

अपूरे साधनसुविधा आणि गुराूंमुळे पिकांचे होणारे नुकसान यांसारख्या समस्यांमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले होते. परिणामी, गेल्या १५ वर्षांपासून या जमिनी पडिक होत्या. या समस्येची दखल घेत स्थानिक पंचसदस्य तथा माजी सरपंच दीपा पेडणेकर आणि पंचायत मंडळाने सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.

Goa Agriculture News
Siolim Goa Election | शिवोली मतदारसंघात भाजपचीच कसोटी

स्थानिक आमदार डिलायला लोबो यांच्या सहकार्याने सरकारकडून निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.कम्युनिटी फार्मिंग योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा शेती करणे शक्य होणार आहे. सुरुवातीला या जमिनीवर हळसाणा पिकाची लागवड करण्यात येईल. त्यानंतर भातशेती करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

— दीपा पेडणेकर

मुख्यमंत्री, कृषिमंत्र, स्थानिक पंचसदस्य दीपा पेडणेकर आणि पंचायत मंडळ यांच्या पुढाकारांमुळे येथील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. संपूर्ण मतदारसंघातील शेतकऱ्यांना वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले आहे. कम्युनिटी फार्मिंग योजनेमुळे परिसरातील शेती आणि कृषी उत्पादनात निश्चितच वाढ होईल. शेतकऱ्यांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन शेतीला प्राधान्य द्यावे.

दिलायला लोबो, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.