Siolim Goa Election | शिवोली मतदारसंघात भाजपचीच कसोटी

Siolim Goa Election | आमदार डिलायला लोबोंचा प्रभाव; बहुसंख्य विस्ती मतदारांचा नेहमी काँग्रेसच्या बाजूने कौल
goa assembly winter session
goa assembly winter session Pudhari
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

कोणे एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला शिवोली मतदारसंघ सध्या भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे; याला अपवाद मात्र दोन-तीन निवडणुका. १९८० मध्ये अपक्ष, २०१७ मध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाने, तर २०२२ मध्ये काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात विजय मिळवला होता. २०२७ ची निवडणूक पाहता या मतदारसंघात खरी लढत भाजप विरुद्ध भाजप अशीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

goa assembly winter session
Calangute Assembly Election Goa | कळंगुटमध्ये विरोधकांच्या एकजुटीकडे लक्ष

आज या मतदारसंघात भाजपचा आमदार व भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य असल्यामुळे भाजपचा प्रभाव या मतदारसंघात बऱ्या प्रमाणात दिसून येतो. विद्यमान आमदारांना कोणीही जाहीररीत्या विरोध करीत नसला, तरी भाजप अंतर्गत त्यांना विरोध होत असल्याचे सांगितले जाते. विद्यमान आमदार डिलायला लोबो यांनी नुकत्याच निवडलेल्या युवा व महिला समितीत तसेच मंडळ समितीत आपल्याच समर्थकांची वर्णी लावल्यामुळे या पक्षात बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यकर्ते दुखावलेले आहेत.

कार्यक्रमाच्यावेळी जे कार्यकर्ते लोबो यांच्यासोबत दिसून येतात तेच कार्यकर्ते दयानंद मांद्रेकर यांच्यासोबतही असतात. डिलायला लोबो यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे नाराज झालेले व दुरावलेले मद्रिकर दुखावले जाऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना अनुसूचित जाती महामंडळाचे अध्यक्षपद देऊन काहीसे शांत केले असले तरीसुद्धा त्यांनी येत्या निवडणुकीत भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे.

या मतदारसंघात काँग्रेसचे विशेष कार्य नसले तरी ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून दिलायला लोबो निवडून आल्या होत्या. याचाच परिणाम म्हणून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे ४ ते ५ इच्छुकांनी निवडणुकीला उभे राहण्याची तयारी सुरू केली आहे. बहुसंख्य ख्रिस्ती मतदार काँग्रेसच्या बाजूने राहिल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे.

गोवा मुक्त्तीनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संस्थापक सदस्य पां. पु शिरोडकर हे १९६३ च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर १९६७ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पुनाजी आचरेकर विजयी झाले होते. १९७२ ते १९८० पर्यंत चंद्रकांत चोडणकर हे या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, १९८० मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अशोक साळगावकर यांचा पराभव केला होता. १९८४ व्या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अशोक साळगावकर हे विजयी झाले होते.

त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवणाऱ्या चंद्रकांत चोडणकर यांचा पराभव केला होता. १९८९ मध्येही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अशोक साळगावकर यांनी काँग्रेसचे चंद्रकांत चोडणकर यांचा अवघ्या २३ मतांनी पराभव केला होता. १९९४ च्या निवडणुकीत चंद्रकांत चोडणकर यांनी पुन्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती व काँग्रेसवे अशोक साळगावकर यांचा २४६ मतांनी पराभव केला होता. यावरून शिवोली मतदारसंघात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची ताकद किती होती हे दिसून येते.

परंतु त्यानंतर भाजपासोबत युती केल्यामुळे आता या मतदारसंघात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची ताकद उरलेली दिसत नाही. काँग्रेस या मतदारसंघात कधीच फार मजबूत नव्हती, तरीसुद्धा काँग्रेसला १९९९ मध्ये विजय मिळवता आला असता; परंतु काँग्रेसचे दोन ख्रिस्ती नेते या निवडणुकीत उभे राहिल्यामुळे मतांची विभागणी झाली आणि त्याचाच फायदा भाजपाला झाला. १९९९ ची निवडणूक पंचरंगी झाली होती.

त्यामध्ये भाजपचे दयानंद मांद्रेकर हे अवघ्या २७ टक्के इतक्या कमी मतांच्या टक्केवारीसह विजयी झाले होते. त्यानंतर २००२, २००७आणि २०१२ च्या निवडणुकांत दयानंद मांद्रेकर यांनी निर्विवादपणे निवडून येत आपणाशिवाय या मतदार संघाला कोणी नेता मिळणार नाही, असा समज करून घेतला तसेच त्यांचे कार्यकर्तेही गर्वाने फुलून गेले होते. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत मात्र, विनोद पालयेकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता.

दिवंगत बंधू उदय पालयेकर यांच्या समाजकार्याच्या मिळकतीवर व मांद्रेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अहंकाराला विरोध म्हणून मतदारांनी नवीन चेहऱ्याची निवड केली. पहिल्यांदाच निवडून येत मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या पालवेकर यांनी विकास कामांचा धडाका लावला होता; परंतु कोविड संक्रमण काळात त्यांनी मतदारांशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा जोरदार धक्का त्यांना २०२२ च्या निवडणुकीत बसला.

२०२२ मध्ये काँग्रेस प्रथमच शिवोली मतदारसंघातून विजयी झाली. यावेळी मतदार संघातील सर्व ख्रिस्ती मतदार काँग्रेसच्या बाजूने राहिले. निवडणुकीपूर्वी काँग्रेसवासी झालेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी त्यांच्या पत्नी दिलायला लोबो यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यास काँग्रेसला भाग पाडले होते.

काँग्रेसच्या उमेदवार दिलायला लोबो यांनी भाजपचे दयानंद मांद्रेकर यांचा पराभव केला होता. डिलायला लोयो यांना २६९९ मते मिळाली होती तर दयानंद मांद्रेकर यांना ७२७२ मते मिळाली होती. आरजीपी पक्षाचे आचे गौरीश मांद्रेकर यांनी जवळपास ३१८८ मते मिळवली होती, या मत विभागणीमुळे दयानंद मांद्रेकर यांना फटका बसल्याचे निकालावरून दिसून आले. निकालानंतर काही दिवसांतच आमदार डिलायला लोबो भाजपात आल्या

goa assembly winter session
Goa Politics-संकेत आर्सेकरांच्या एण्ट्रीने बदलणार समीकरणे

काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

काँग्रेस पक्षातर्फे राजन घाटे, पार्वती नागवेकर, कपिल कोरगावकर, अॅड. चोडणकर, योगेश गोवेकर ऊर्फ मोर्गेम्बो व गजानन तिळवे असे पाच ते सहा जण निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत. यापैकी काँग्रेस पक्षातर्फे योगेश गोवेकर यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला चांगली टक्कर दिली होती.

जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये भाजपने ज्या प्रकारे आगा आपल्या पदरात पाडून घेतल्या, त्यावरून विरोधक कितीही प्रयत्न करत असले, तरी सध्या तरी त्यांचा निभाव लागणे कठीण असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यमान आमदार हिलायला लोबो यांनाही आगामी निवडणूक सहजपणे जिंकणे शक्य होणार नाही, अशी चर्चा आहे. कारण भाजपचे मतदार माजप बरोबर राहतील यात शंका नाही; परंतु काँग्रेसचे मतदार कोणती भूमिका घेतात, यावर डिलायला लोबो यांचे भवितव्य अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news