Rahul Faldessai | आमदार राजेश फळदेसाई यांच्या पुत्राचा अखेर पोलिसांसमोर माफीनामा! कुडचडकर कुटुंबीयांच्या पाया पडत मागितली माफी

Rahul Faldessai | आमदार राजेश फळदेसाई यांचे पुत्र राहुल फळदेसाई यांनी मंगळवारी कुडचडे पोलिस स्थानकात येऊन कुडचडकर कुटुंबीयांसह समस्त कुडचडेवासियांची जाहीर माफी मागितली.
Rahul Faldessai
Rahul Faldessai
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे येथे ज्येष्ठ नागरिक ॲड. शांताराम कुडचडकर, त्यांच्या सूनबाई आणि दोन लहान नातवंडांच्या वाहनाचा कथितरीत्या पाठलाग करून धमकावल्याच्या प्रकरणाला मंगळवारी नवे वळण मिळाले. आमदार राजेश फळदेसाई यांचे पुत्र राहुल फळदेसाई यांनी मंगळवारी कुडचडे पोलिस स्थानकात येऊन कुडचडकर कुटुंबीयांसह समस्त कुडचडेवासियांची जाहीर माफी मागितली. यावेळी त्यांनी आपली चूक मान्य केली.

Rahul Faldessai
Sal River Pollution | सासष्टीची जीवनदायिनी धोक्यात! मडगाव-फातोर्डाच्या सांडपाण्याने साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात

दरम्यान, दै. 'पुढारी'ने 'आमदार राजेश फळदेसाई यांच्या पुत्रावर गंभीर आरोप' या मथळ्याखाली तक्रारीतील आरोप, वाहनाचा पाठलाग, सीसीटीव्ही फुटेज आणि कारवाईची मागणी अशी बातमी प्रसिद्ध करून त्याचा पाठपुरावा केला होता.
शनिवारी रात्री पंटेमळ जंक्शन परिसरात घडलेल्या कथित 'रोड-रेज'च्या प्रकारामुळे कुडचडे शहरात खळबळ उडाली होती. ॲड. शांताराम व्ही. कुडचडकर यांनी कुडचडे पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, ते सुनेसह आणि दोन लहान नातवंडांसह मडगावच्या दिशेने जात असताना एका वाहनाने त्यांचा मार्ग अडवला. त्यानंतर वाद झाला आणि संबंधित वाहनाने त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचा आरोप तक्रारीत केला होता.

तक्रारदाराने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे सादर केले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही घटनेची दखल घेत पोलिसांना चौकशीचे निर्देश दिले होते.
मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास राहुल फळदेसाई कुडचडे पोलिस स्थानकात दाखल झाले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक ॲड. शांताराम कुडचडकर यांच्या पायाला स्पर्श करून आपण चुकलो असल्याचे सांगितले.

'यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही,' असे सांगत त्यांनी कुडचडकर कुटुंबीयांची माफी मागितली. तसेच घटनेमुळे कुडचडेवासियांच्या भावना दुखावल्या असल्यास त्याबद्दलही त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. कुडचडकर कुटुंबीयांनी राहुल यांची माफी स्वीकारत, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित नागरिक आणि कुडचडकर कुटुंबीयांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडी सळी आपल्या वाहनात ठेवली होती, असे सांगितले. आपल्याला कोणाकडूनही भीती नाही आणि आपला कोणी शत्रू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समाजमाध्यमांवर आपल्या संदर्भात विविध आरोप केले जात असल्याबाबत विचारले असता, आपण कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ सेवन करत नसल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभारजुवे येथे राहतेलो असलो तरी आपले मूळ घर केपे येथे असल्याने या भागात आपली नेहमी ये-जा असते, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. यावेळी कुडचडकर कुटुंबीयांच्या वतीने वरुणा कुडचडकर यांनी भविष्यात अशा स्वरूपाचा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Rahul Faldessai
Sal River Pollution | सासष्टीची जीवनदायिनी धोक्यात! मडगाव-फातोर्डाच्या सांडपाण्याने साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात

तसेच या प्रकरणात आमदार राजेश फळदेसाई यांनी कोणताही राजकीय अथवा पोलिसांवर दबाव आणला नाही, याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी सोहन सावर्डेकर, हरीश काकोडकर यांच्यासह कुडचडेतील अनेक नागरिक उपस्थित होते. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेल्या या प्रकरणात राहुल फळदेसाई यांनी स्वतः पोलिस स्थानकात येऊन जाहीर माफी मागितल्याने वातावरण काही प्रमाणात निवळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news