Goa Shops | रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी आठ तास कामाचा प्रस्ताव

Goa Shops | आठवड्याची मर्यादा 48 तास; मसुदा नियमांवर 15 दिवसांत सूचना मागविल्या
Nevasa Shop Theft
Nevasa Shop TheftPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला आठ तास कामाची मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. गोवा दुकाने आणि आस्थापना (रोजगार नियमन आणि सेवाशर्ती) नियम, २०२६ च्या मसुदानुसार, कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक कामाचे तास ४८ पेक्षा अधिक असू नयेत.

Nevasa Shop Theft
Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल

मसुदा नियम अधिसूचित करण्यापूर्वी सरकारने त्यावर १५ दिवसांत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. उद्योग क्षेत्रात आठ तास कामाचा नियम असला, तरी दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा त्यापेक्षा अधिक वेळ काम करावे लागते. तसेच, त्यांना सेवेत कायम केले जात नसल्याची बाबही समोर आली आहे.

त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिवसाला आठ तास कामाची मर्यादा लागू करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. मसुदानुसार, प्रत्येक नेयोजत्याने सूचना फलकावर फॉर्म-ई प्रदर्शित करणे आवश्यक असेल. त्यात दैनंदिन कामाचे तास, विश्रांतीचा कालावधी आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा तपशील द्यावा लागेल. आस्थापनेची जागा स्वच्छ, हवेशीर आणि पुरेशा प्रकाशाची असावी. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ शौचालयांची व्यवस्था करणे नियोक्त्यांना बंधनकारक असेल.

Nevasa Shop Theft
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

वेतन, रजेच्या नोंदी ठेवणे बंधनकारक

गोवा वेतन नियम संहिता, २०२६ नुसार, नियोक्त्यांना कामगारांची संख्या, उपस्थिती, वेतन, अतिरिक्त कामाचा मोबदला, आगाऊ रक्कम, दंड, कपात आणि वेतन पावत्यांचा तपशील असलेला नोंदवह्या व अभिलेख ठेवावे लागतील. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मंजूर अर्जित रजेची तसेच मंजूर किंवा नामंजूर केलेल्या रजेच्या अर्जाची नोंद रजा पुस्तकात ठेवावी लागेल. या पुस्तकाची एक प्रत नियोक्त्याने स्वतःकडे ठेवणे आवश्यक असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news