Gaur Attack Ponda | फोंड्यात गव्याचा थरार! ड्युटीवरून घरी जाणाऱ्या गृहरक्षकाचा शिंगांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

Gaur Attack Ponda | महामार्गावर घडली घटना
Pimpalgaon Vhannur gaur sighting
Pimpalgaon Vhannur gaur sighting ( File Photo)
Published on
Updated on

फोंडा: पुढारी वृत्तसेवा

बेतोडा-फोंडा चौपदरी महामार्गावर गव्याच्या हल्ल्यात पोलिस खात्यातील गृहरक्षक ठार झाले. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असून मृताचे नाव दिनेश तुळशीदास गावडे (४८ वर्षे) असे आहे.

Pimpalgaon Vhannur gaur sighting
Dhule Shivsena Protest | देवाधर्माच्या आडून होणाऱ्या बेकायदेशीर कामांना ठाम विरोध; ठाकरे गटाचा इशारा

ते उडीवाडा - उसगाव येथील रहिवासी होते. दिनेश गावडे हे फोंडा पोलिस स्थानकात गृहरक्षक म्हणून कार्यरत होते. ड्युटीवरून घरी जाताना बेतोडा येथील आपल्या मित्राला भेटण्यासाठी दिनेश गावडे दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून चालत जात असताना झाडीत असलेल्या गवा अचानक त्यांच्या समोर आला.

गव्याला पाहून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना गव्याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला करत दिनेशच्या पाठीत शिंगे खुपसली. गंभीर जखमी अवस्थेत दिनेश यांन आरडाओरड केल्यानंतर त्यांना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.

Pimpalgaon Vhannur gaur sighting
Nashik -गोदाप्रदूषण रोखण्यासाठी 13 वर्षांनंतर पोलिस पथक

मात्र, रात्री उपजारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुत् आहेत. दरम्यान, १२ ऑक्टेबर २०२४ रोजी बेतोडा येथील मंगला गावडे हिच्यावर गव्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल होता. वन खात्याने या प्रकारची गंभीर दखल घेऊन गव्यांना हुसकावून लावावे अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news