Goa | पोलिसांनी अडवला मराठी राजभाषा समितीचा मोर्चा

Police stop Marathi language committee march-बॅरिकेडस् घालून मार्गात अडथळा; मराठीप्रेमींचा रस्त्यावर ठिय्या
पर्वरी: पणजीच्या बाजूने पूल सुरू होण्यापूर्वीच मराठी राजभाषा समितीचा मोर्चा पोलिसांनी अडविला. (छाया : समीर नार्वेकर)
पर्वरी: पणजीच्या बाजूने पूल सुरू होण्यापूर्वीच मराठी राजभाषा समितीचा मोर्चा पोलिसांनी अडविला. (छाया : समीर नार्वेकर)
Published on
Updated on

पणजी : बसस्थानकाकडून पणजी सोमवारी सकाळी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मराठीप्रेमींनी सकाळी १० वा. विधानसभेवर मोर्चा नेण्यास सुरुवात केली. त्यापूर्वीच जुन्या मांडवी पुलावर कडक बंदोबस्त, बेरिकेडस् घालून रस्ता अडवण्यात आला होता. पणजीच्या बाजूने पूल सुरू होण्यापूर्वीच हा मोर्चा पोलिसांनी अडविला.

पर्वरी: पणजीच्या बाजूने पूल सुरू होण्यापूर्वीच मराठी राजभाषा समितीचा मोर्चा पोलिसांनी अडविला. (छाया : समीर नार्वेकर)
Indigo Flight Emergency landing : इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; गोवा विमानतळावर ‘इमर्जन्सी’ घोषित

मराठीप्रेमींनी रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलन सुरू केले. यावेळी दहाजणांच्या शिष्टमंडळाने सरकारला निवेदन देण्यासाठी तिसवाडीच्या मामलेदारांकडे नावे दिली. दुपारी दीड वाजता शिष्टमंडळाला बोलावून मुख्यमंत्र्यांनी मागणीबाबत चर्चा केली. मात्र कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यानंतर दुपारी हा मोर्चा विसर्जित करण्यात आला.

प्रा. वेलिंगकर म्हणाले की, कोकणीला राजभाषा दर्जा मिळवून घेण्यासाठी राज्यामध्ये 'कोकणी प्रजेचो आवाज' याच्या नावाखाली जी गुंडागिरी करून जाळपोळ, तसेच लुटालूट झाली त्याचप्रमाणे मराठीप्रेमींनीही करावे तर प्रश्न सोडवू, असे सरकारला जर वाटत असेल तर ते सुद्धा करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

पर्वरी: पणजीच्या बाजूने पूल सुरू होण्यापूर्वीच मराठी राजभाषा समितीचा मोर्चा पोलिसांनी अडविला. (छाया : समीर नार्वेकर)
द. गोवा जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

यावेळी गो. रा. ढवळीकर, शिवसेना संपर्क प्रमुख सुभाष सावंत, रोशन सामंत, दत्ताराम देसाई, राजेंद्र वेलिंगकर, गजानन मांद्रेकर, सत्यविजय नाईक, आनंद देसाई, आत्माराम गावकर, नितीन फळदेसाई, तुषार टोपले, सुरेंद्र शेट्ये, तसेच विनय नाईक यांनी मते मांडली. प्रत्येक मतदारसंघात सरासही ७.५ हजार ते ८ हजार मराठीप्रेमी असल्याने त्याचा परिणाम सत्तेत असलेल्या आमदारांवर नक्कीच पडणार आहे. २०२७ च्या निवडणुकीला भाजपला पराभवाला सामोरे जावे लागणार, आहे असे मराठीप्रेमी नेत्यांनी व्यक्त केले.

वेलिंगकर, गजानन मांद्रेकर, सत्यविजय नाईक, आनंद देसाई, आत्माराम गावकर, नितीन फळदेसाई, तुषार टोपले, सुरेंद्र शेट्ये, तसेच विनय नाईक यांनी मते मांडली. प्रत्येक मतदारसंघात सरासही ७.५ हजार ते ८ हजार मराठीप्रेमी असल्याने त्याचा परिणाम सत्तेत असलेल्या आमदारांवर नक्कीच पडणार आहे. २०२७ च्या निवडणुकीला भाजपला पराभवाला सामोरे जावे लागणार, आहे असे मराठीप्रेमी नेत्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, राज्यात अनेक चिंताजनक समस्या आहेत. ज्यांवर प्रकाश टाकून चर्चा करणे आवश्यक आहे. अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीपेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत. जुने मुद्दे पुन्हा उकरून काढल्याने गोव्याच्या लोकांना किंवा 'जनरेशन झेड' सह पुढच्या पिढीला कोणताही फायदा होणार नाही, असे मतही त्यांनी मराठी राजभाषा आंदोलनाबाबत बोलताना व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news