PM Narendra Modi | राज्यातील युवक साधणार पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद

PM Narendra Modi | 27 रोजी उत्तर-दक्षिण गोव्यात आभासी संवाद कार्यक्रमाचे आयोजन
PM Narendra Modi
PM Narendra Modi
Published on
Updated on

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या 'माय भारत', गोवा आणि एनएसएस गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर २७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद कार्यक्रम होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

PM Narendra Modi
Goa Bus Owners | '...तर अमित शहा, नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवू' ऑल गोवा बस ओनर्स असोसिएशन'चा थेट इशारा!

राज्यातील युवक व विद्यार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या विचारांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच युवकांमध्ये क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, निरोगी जीवनशैली आणि सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करणे हे या उपक्रमाचे प्रमुख हेतू आहेत.

'या' ठिकाणी होणार कार्यक्रम

उत्तर गोव्यात सेंट झेव्हियर्स कॉलेज, म्हापसा; विद्या प्रबोधिनी कॉलेज, पर्वरी; तसेच शासकीय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सांखळी येथे. तर दक्षिण गोव्यात रोझरी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नावेली आणि श्री गोपाळ गावकर मेमोरियल गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेज येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news