PWD Goa Highway Divider | "महामार्गावर पिंपळाची रोपे भविष्यात त्रासदायक! मेरशी ते जुने गोवे मार्गावर तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा"

PWD Goa Highway Divider | तज्ज्ञांचे मत : मोठी झाल्यानंतर दीर्घकालीन धोका; शोभेची झाडे-झुडपे योग्य
PWD Goa Highway Divider | "महामार्गावर पिंपळाची रोपे भविष्यात त्रासदायक! मेरशी ते जुने गोवे मार्गावर तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा"
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकारने राज्यभरात दहा लाख झाडांची रोपे लावण्याची घोषणा करतानाच बहुतांश झाडे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला लावण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार मेरशी ते जुने गोवे बगल मार्गावर कदंबा पठार येथील महामार्गाच्या दुभाजकावर पिंपळाची रोपे लावण्यास सुरुवात केली आहे.

PWD Goa Highway Divider | "महामार्गावर पिंपळाची रोपे भविष्यात त्रासदायक! मेरशी ते जुने गोवे मार्गावर तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा"
Mumbai Goa Highway Accident |मुंबई-गोवा महामार्गावर अमोनिया गॅसचा टँकर पलटी; गॅसगळती टळल्याने मोठा अनर्थ टळला

मात्र, ही रोपे ज्यावेळी मोठी होतील, त्यावेळी ती प्रवाशांसाठी दीर्घकालीन धोका निर्माण करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. ग्रीन कॉरिडॉर उपक्रमांतर्गत गेल्या काही दिवसांत येथे शंभरहून अधिक रोपे लावण्यात आली आहेत, आज मंगळवारीही रोपे लावणे सुरू होते.

लँडस्केप डिझायनर आणि बॉटॅनिकल सोसायटी ऑफ गोवाचे अध्यक्ष डॅनियल डिसोझा यांच्या मते, पिंपळाचे झाड हे जंगलातील एक मोठे झाड आहे आणि महामार्गाच्या दुभाजकासाठी त्याची निवड चुकीची आहे.

PWD Goa Highway Divider | "महामार्गावर पिंपळाची रोपे भविष्यात त्रासदायक! मेरशी ते जुने गोवे मार्गावर तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा"
Sindhudurg News : पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

पिंपळामुळे रस्ता निसरडा होऊ शकतो, असे डिसोझा म्हणाले. ही झाडे जसजशी मोठी होतील, तसतशी त्यांची मुळे पदपथाचे दगड उचलू शकतात आणि कालांतराने रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुकसान करू शकतात. त्यामुळे पिंपळाची रोपे विस्तीर्ण अशा जागी लावावीत.

रस्त्याच्या मध्ये नको, हे वृक्षारोपण थांबवून आधीच लावलेली रोपे काढून ती योग्य ठिकाणी लावली पाहिजेत. असे सांगून त्यांनी सुचवले की, महामार्गाच्या दुभाजकांसाठी टेकोमा, ओलिअँडर आणि विंका यांसारखी लहान शोभेची झाडे आणि झुडपे अधिक योग्य ठरतील.

PWD Goa Highway Divider | "महामार्गावर पिंपळाची रोपे भविष्यात त्रासदायक! मेरशी ते जुने गोवे मार्गावर तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा"
Mumbai- Goa Highway | "मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडण्यास प्रारंभ! पणदूर अन् वेताळबांबर्डेतील खड्डा ठरतोय जीवघेणा"

उद्यानशास्त्रज्ञ मिगुएल ब्रागांझा यांच्या मते, झाडाची निवड ते कुठे लावले जाते यावर अवलंबून असते. झाड योग्य आहे; पण चुकीच्या जागी आहे, असे ब्रागांझा म्हणाले. ब्रागांझा पुढे असेही म्हणाले की, मार्गदर्शक तत्त्वांनुसार महामार्गाच्या दुभाजकांवर साधारणपणे अशी लहान झाडे असावीत, जी दृश्यमानतेत अडथळा न आणता रस्त्याचे सौंदर्य वाढवतील.

बांधकाम खात्याने लक्ष देण्याची गरज

उद्यानशास्त्रज्ञ मिगुएल ब्रागांझा म्हणाले की, ताडाची झाडे आणि इतर लहान शोभेची झाडे दुभाजकांसाठी अधिक योग्य आहेत. पिंपळाची रोपे रुजण्यापूर्वीच त्यांचे इतरत्र पुनरोपण करावे. जरी गोवा राज्य जैवविविधता मंडळ आणि वन विभाग यांसारख्या इतर संस्थांचाही ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पात सहभाग असला तरी, रस्त्यालगतच्या वृक्षारोपणाबाबतच्या निर्णयांची अंतिम जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news