Russian Women Murder Case | 'त्या' रशियन महिलांच्या मृतदेहांवर पणजीत अंत्यसंस्कार

Russian Women Murder Case | दोन रशियन महिलांचे खून करून खळबळ उडवून दिलेला रशियन नागरिक संशयित अलेक्सी लिओनोव्ह याने सध्या मौन बाळगले आहे.
Russian Women Murder Case
Russian Women Murder Case
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

दोन रशियन महिलांचे खून करून खळबळ उडवून दिलेला रशियन नागरिक संशयित अलेक्सी लिओनोव्ह याने सध्या मौन बाळगले आहे. त्यामुळे पोलिस तपास मंदावले आहे. खून करण्यात आलेल्या दोन्ही महिलांचे अंत्यविधी पणजी येथील सांतईनेज स्मशानभूमीवर करण्यात आले. कुटुंबीयांच्या तसेच भारतातील रशियन दूतावासाच्या मान्यतेने अंत्यविधी करण्यात आले. यावेळी रशियन दूतावासाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Russian Women Murder Case
Coconut Carving Art | असोल्या नारळावरची हटके कोरीव कला; लोकोत्सवात नाईक कुटुंबीयांचा स्टॉल चर्चेत

पेडणे तालुक्यात दोन रशियन महिलांचे खून करण्यात आल्याचे पुढे येताच एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी अलेक्सी लिओनोव्ह याला अटक करून चौकशी केली असता, दोन रशियन महिलांचा खून केल्याची कबुली दिली होती. एलेना कास्थानोव्हा (वय ३७) व एलिना वानिवा या दोघांचा त्यात समावेश होता.

एलेना कास्थानोव्हा यांचा मृतदेह हरमल येथील एका भाड्याच्या खोलीत सापडला होता. शरीरावर जखमा होत्या. अशाच प्रकारे एलिना हिचाही मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता, संशयित अलेक्सी याने गोव्यासहीत भारतातील इतर राज्यांतील वास्तव्यात अनेकांचे खून केल्याचे सांगत एकच खळबळ माजवून दिली होती. मात्र, संशयित अलेक्सी हा पोलिसांना चक्रावत असल्याचे नंतर पोलिस तपासात उघड झाल्याचे पोलिस अधिकारी सांगतात.

Russian Women Murder Case
Panajim Lokotsav 2027 | गोव्याची ओळख परंपरेत दडलेली

सध्या, दोन रशियन महिलांच्या खूनप्रकरणासंदर्भात त्याच्याकडून अधिक माहिती पोलीस घेत आहेत. आणखी खून केल्याच्या त्याच्या जबानीत काहीच तथ्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कारण त्याने नावे घेतलेल्या इतर महिला जीवंत असल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अलेक्सी लिओनोव्ह याने गोव्यासहीत भारतातील अन्य राज्यांत आपल्या वास्तव्यात अनेकांचे खून केल्याचे सांगून खळबळ माजवून दिली होती. अनेकांना आपण खून करून मोक्ष दिल्याचे तो पोलिसांना सांगत होता. आपल्या आईचे नाव एलेना होते व आई आपल्याला सतावत असल्याने या नावाबद्दल द्वेष होता. त्यातूनच आपण आईच्या नावाचे साम्य असलेल्या दोन रशियन महिलांचे खून केल्याचे आणखी एक कथानक पोलिसांना सांगत पोलिसांची दिशाभूल चालवली होती.

मात्र, आता संशयित अलेक्सी याने सध्या मौन बाळगले आहे. तो आता पोलिसांना काहीच माहिती देत नसल्याने पोलिसांनाही तपासात अडथळा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news