Panaji Municipal Election 2026 | 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा; पणजी क्षेत्रात लवकरच आचारसंहिता लागू होणार

Panaji Municipal Election 2026 | राज्य निवडणूक आयोग करणार आज घोषणा; सर्वांना उत्सुकता
Panaji Municipal Corporation Reservation
Panaji Municipal Corporation Reservation
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिका मंडळाची मुदत पुढील मार्च महिन्यात संपत असल्याने महापालिका निवडणूक १४ मार्चला घेण्याचे निश्चित झाले आहे तर ११ पालिकांच्या निवडणुका मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातची घोषणा १६ फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोग करणार आहे.

Panaji Municipal Corporation Reservation
Goa Carnival | पणजीत कार्निव्हलची धूम

निवडणुकीसाठीचा पोलिस सुरक्षा यंत्रणेचा आराखडा तयार करण्यात येत आहे. पणजी महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर होताच त्या दिवसांपासून महापालिकेच्या क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. राज्यातील ११ पालिकां मंडळांपैकी काहींची मुदत मार्च, एप्रिल व मे महिन्यात संपत आहे.

त्यामुळे या पालिकांची एकत्रित निवडणूक घेण्यासाठी एकच तारीख निश्चित करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्राने दिली. विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची अंतिम मतदार यादी येत्या २३ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. महापालिकेच्या प्रभाग फेरचना व आरक्षण जाहीर झाले आहे त्यामुळे पणजी महापालिकेची निवडणूक या नव्याने तयार झालेल्या मतदार यादीनुसार घेण्याची शक्यता अधिक आहे.

इतर पालिकांची प्रभाग फेररचना ही मतदार यादी जाहीर झाल्यानंतर करण्यात येणार आहे. या पालिकांची निवडणूक या नव्या मतदार यादीनुसार घेतली जाणार असल्याचे या सूत्राने सांगितले. महापालिका व पालिका निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती काम सुरू आहे. निर्वाचन अधिकारी व सहाय्यक निर्वाचन अधिकारी तसेच भरारी पथके नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तालुकावार असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडेच ही जबाबदारी दिली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. उमेदवारी भरण्यासाठीची व्यवस्था संबंधित तालुकावार उपजिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे असे अधिकाऱ्याने माहिती दिली.

पणजी महापालिका निवडणुकीसाठी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी या पॅनलच्या ३० संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित झाली असून रविवारी किंवा सोमवारी ती अधिकृत घोषीत केली जातील.

महापालिकेच्या ३० प्रभागापैकी तब्बल १३ जागी नवे उमेदवार देण्यात आले असून ही टक्केवारी ४३ टक्के भरते. दोन वेळ सलग निवडून आलेले उपमहापौर संजीव नाईक यांचा प्रभाग महिलासाठी राखीव झाल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. तसेच नगरसेवक संतोष उर्फ बंटी गोवेकर यांचा प्रभागही महिला राखीव झाल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालेली नाही.

महापौर रोहित मोन्सेरात व माजी महापौर उदय मडकईकर यांचे प्रभाग महिला राखीव झाले असूनही त्यांना दुसऱ्या प्रभागातून संधी मिळाली आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यांने महापालिकेतील सर्वच्या सर्व ३० जागा जिंकण्याची घोषणा केलेली आहे.

महापालिकेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी त्याना कामही सुरु केले आहे. ३० प्रभागासाठी जी नावे निश्चीत झाली आहेत त्यात ५० टक्केनवे चेहरे असतील, असे मोन्सेरात यांनी सांगितले होते. मात्र, जी ३० उमेदवारांची यादी निश्चित झाली आहे त्यात कबीर पिंटो माखिजा, संजीव देसाई, रुपेश हळर्णकर, तुकाराम चिनानवर, प्रज्योत वायंगणकर, मिलिंद शिरोडकर, करिना शिरोडकर, मार्गारिटा फर्नांडिस, विद्या गडकर, युतिका जांबावलीकर, ज्योती मोरजकर, कीर्ती शिरोडकर व किशोर शास्त्री हे १३ उमेदवार यावेळी नवे चेहरे असून ६ जण पूर्वी नगरसेवक होते.

Panaji Municipal Corporation Reservation
Dr. Pramod sawant Goa | 'त्यांनी' आता पणजी फिरून पाहावी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

विरोधात तिघांची युती

मोन्सेरात यांच्या विरोधात माजी महापौर व नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, उत्पल पर्रीकर व दत्तप्रसाद नाईक या नेत्यांनी युती करुन पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नेत्यांची अद्याप एकत्र बैठक झालेली नाही त्यामुळे ते कुणाला उमेदवारी देतात व काँग्रेस पक्ष या पॅनलला पाठिंबा देणार का, ते पाहावे लागेल.

नव्यांना संधी दिली : रोहित मोन्सेरात पणजी महापालिका निवडणुकीत आमच्या पॅनेलमध्ये एकूण १३ जणांना यावेळी नव्याने संधी दिली आहे. त्यातील ८ जण पूर्ण नवे आहेत. पणजीच्या विकासासाठी आपल्या पॅनेलने सुरू केलेले काम पुढेही सुरूच राहील, असे महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news