Goa Carnival | पणजीत कार्निव्हलची धूम

पर्यटकांचा मोठा प्रतिसाद
Goa Carnival | पणजीत कार्निव्हलची धूम

गोमंतकीय जनतेला खा, प्या, मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल शनिवारी पणजी येथे सादर झाला. दिवजा सर्कल येथून चित्ररथ व नृत्यांना सुरुवात झाली. (सर्व छायाचित्रे समीर नार्वेकर)

1. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

जुन्या सचिवालयाजवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक, महापौर रोहित मोन्सेरात यांच्या उपस्थितीत परेडचे उद्घाटन झाले.

2. कार्निव्हल परेडमधील किंग मोमोचा चित्ररथ

या कार्निव्हल परेडमध्ये किंग मोमोच्या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले

3. चित्ररथ, संगीत नृत्याने वेधले लक्ष

त्यानंतर कार्निव्हल फेरीत सहभागी झालेले चित्ररथ आणि नृत्य पथके संगीताच्या तालावर नाचत पुढे कला अकादमीपर्यंत गेली.

4. कार्निवलसाठी पर्यटकांची मोठी गर्दी

ही रंगीबेरंगी परेड पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह देशी व विदेशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

5. सामाजिक संदेश देणारेही चित्ररथ 

कार्निवल मध्ये काही चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिले जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news