Liquor Ban in North Goa Villages |शिरगावसह सहा गावांमध्ये मद्यविक्रीस बंदी

Liquor Ban in North Goa Villages- लईराई जत्रेनिमित्त उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Liquor Ban
Liquor Ban
Published on
Updated on

पणजी : शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या मंगळवार, दि. २१ रोजी सुरु होणाऱ्या जत्रोत्सवानिमित्त शिरगावसह परिसरातील सहा गावांमधील सर्व मद्यविक्रीची दुकाने २२ एप्रिलपर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिले आहेत. शिरगाव, मुळगाव, मये, खोर्जुवे, पैरा आणि अस्नोडा या सहा गावातील मद्याची दुकाने दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ते दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Liquor Ban
Goa Sexual Harassment Case | कळस गाठला! विद्यार्थ्यांचे शोषण करणाऱ्या प्राचार्याचे 'बड्या' नेत्यासमोर लोटांगण; कुशावती हादरले

हे आदेश काढतानाच स्थानिक पोलिस आणि अबकारी विभागाला या आदेशाची कड़क अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधीकाऱ्यांनी दिले आहेत. जत्रेच्या परिसरात आणि संबंधित गावांमध्ये ठिकठिकाणी देखरेख ठेवली जाणार आहे, भाविकांनी आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी या काळात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन यादव यांनी केले आहे.

परवानाधारक आस्थापने पूर्णपणे बंद राहतील, जत्रेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी अबकारी आयुक्तांच्या शिफारसीनुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

Liquor Ban
गोव्यातील प्रसिद्ध लईराई जत्रोत्सव उद्यापासून

दरम्यान, जत्रेसाठी धोंड म्हणून व्रतस्त राहणारे नागरिक व्रताचरण काळापासून ते होमकुंडातून अग्नीदिव्य करीपर्यंत मद्य, मासे व मांस वर्ज करत असतात. अग्निदिव्य करत होमकुंडातून गेल्यानंतर घरी जाऊन आंघोळ वगैरे करुन धोंड महिनाभराचा उपवास सोडतात. मात्र, परिसरातील रेट्रॉरेंट दोन दिवस बंद राहणार असल्याने त्यांना डिचोली, शिरसई येथे जावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news