

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कब्बडी पुरूष विभागात सेनादलाने तर महिला विभागात हिमाचल प्रदेशने सुवर्णपदक मिळविले. पुरुष व महिला विभागात हरियाणा संघाला रौप्यपदक, तर पुरुष विभागामध्ये महाराष्ट्र आणि चंदीगड संघाने कांस्य पदके मिळवली. महिला विभागात राजस्थान व चंदीगड संघानी कांस्य पदके पटकावली. (National Sports Games )
महिला विभागाची पदके क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते तर दिल्लीचे क्रीडा अधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. पुरुष विभागात क्रीडा अधिकारी देवेंद्र कुमार यांनी पदके तर गोव्याचे अधिकारी महादेव आरोंदेकर यांनी स्मृतिचिन्हे प्रदान केली.
कब्बडी सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी गर्दी केली होती. गोवा संघ पहिल्या फेरीमध्ये बाद झाला. सेनादलाने हरियाणा संघावर मात करत सुवर्णपदक पटकावले. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशच्या महिला संघांचा पराभव करीत हरियाणाने सुवर्णपदक मिळविले. (National Sports Games)
क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले, पहाटेपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे पार्किंग क्षेत्रात आणि बाहेरच्या बाजूला काही प्रमाणात पाणी साचले होते. मात्र आतील भागामध्ये त्याचा परिणाम जाणवला नाही. केबलमध्ये पाणी गेल्यामुळे एसी यंत्रणा काही ठिकाणी बिघडली होती. मात्र ती लगेच दुरुस्ती करण्यात आली. गोव्याने पहिल्यांदाच स्पर्धा आयोजन करूनसुध्दा दर्जा राखण्यात यश मिळविले आहे.
हेही वाचा :