Mopa Police Station | मोपा पोलिस ठाणे बंद करण्याच्या किंवा कार्यक्षेत्र कमी करण्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

Mopa Police Station | नागरिकांत नाराजी ; सुरक्षेसह पोलिस सेवांच्या उपलब्धतेवर परिणामाची भीती
goa police
goa police
Published on: 
Updated on: 

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यात यापूर्वी एकच पोलिस ठाणे कार्यरत होते. मात्र, वाढती लोकवस्ती, पर्यटन व्यवसाय, समुद्रकिनारी भागातील वर्दळ आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पेडणे, मांड्रे आणि मोपा अशी तीन पोलिस ठाणी सुरू करण्यात आली.

goa police
Pernem Crime News | पेडणे तालुक्यात खळबळ; शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची टोकाची भूमिका

आता मोपा पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र कमी करून किंवा तेथील सेवा बंद करून पुन्हा दोन पोलिस ठाण्यांची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. या चर्चेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, मोपा परिसरातील गावांच्या सुरक्षिततेवर आणि पोलिस सेवांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि मुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

goa police
Russian Woman Illegal Stay | पेडणे तालुक्यातील कोरगावमध्ये रशियन महिलेचे बेकायदेशीर वास्तव्य; पोलिसांकडून कारवाई

नागरिकांची डोकेदुखी वाढणार

  • मोपा पोलिस ठाणे परिसरातील अनेक गावांसाठी जवळचे आणि सोयीचे ठिकाण आहे.

  • हे पोलिस ठाणे बंद झाल्यास नागरिकांना तक्रारी नोंदवण्यासाठी आणि अन्य कामांसाठी पेर्ने येथे जावे लागू शकते.

  • त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढण्याबरोबरच तक्रारींवर तातडीने प्रतिसाद मिळण्यातही अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news