Morjim Beach Pollution | मोरजीत हॉटेल अन् रिसॉर्टचे सांडपाणी थेट समुद्रात?

Morjim Beach Pollution | मोरजी विठ्ठलदासवाडा किनारी भागातील प्रकारामुळे संताप; आरोग्य खात्यासह पंचायतीकडे कठोर कारवाईची मागणी
Morjim Beach Pollution
Morjim Beach Pollution
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा किनारी भागात काही हॉटेल, रिसॉर्ट आणि गेस्ट हाऊसमधील सांडपाणी कथितरीत्या पाइपद्वारे थेट ओहोळात तसेच समुद्रात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्याचे प्रदूषण होण्याबरोबरच भविष्यात नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Morjim Beach Pollution
Amit Patkar Goa Congress | 'मला बैठकीचे निमंत्रणच नव्हते!' गोवा काँग्रेसमधील अंतर्गत वादावर माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा गौप्यस्फोट

या प्रकाराची पाहणी करून दोषी आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोरजी समुद्रकिनारी भागात पर्यटन व्यवसायाचा झपाट्याने विस्तार होत असून अनेक लहान-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि गेस्ट हाऊसेस कार्यरत आहेत. त्याचबरोबर पर्यटन हंगामात हंगामी स्वरूपाची, तसेच काही ठिकाणी कायमस्वरूपी बांधकामेही उभी राहत आहेत.

विविध आस्थापनांमध्ये १०, २०, ५० ते १०० पर्यंत खोल्या उपलब्ध असून पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक या परिसरात वास्तव्य करतात. मात्र, काही आस्थापनांच्या मालकांनी निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक व्यवस्था केलेली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा किंवा सुरक्षित निचरा व्यवस्था उभारण्याऐवजी काही व्यावसायिकांकडून सांडपाणी पाइपद्वारे थेट ओहोळात सोडले जात असून ते पुढे समुद्रात मिसळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा दावाही करण्यात येत आहे.
उघड्यावर तसेच ओहोळात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे, डास-माशांचा प्रादुर्भाव वाढणे, भूजल व समुद्राचे पाणी दूषित होणे आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा स्थानिक रहिवासी, पर्यटक, मच्छीमार आणि समुद्रकिनाऱ्याच्या पर्यावरणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

Morjim Beach Pollution
Raigad Crime | १ कोटी ४९ लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने महाडजवळ पकडला!

यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मोरजी पंचायत, आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित सरकारी विभागांनी संयुक्त पाहणी करून सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करा

नियमांचे उल्लंघन करून सांडपाणी उघड्यावर, ओहोळात किंवा समुद्रात सोडणाऱ्या आस्थापनांना नोटिसा बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तसेच प्रत्येक हॉटेल, रिसॉर्ट आणि गेस्ट हाऊसला योग्य सांडपाणी प्रक्रिया व विल्हेवाट व्यवस्था उभारणे बंधनकारक करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पर्यावरण धोक्यात आणू नका

पर्यटन व्यवसाय वाढणे आवश्यक असले तरी स्थानिकांचे आरोग्य आणि समुद्रकिनाऱ्याचे पर्यावरण धोक्यात घालून चालवला जाऊ नये. प्रशासनाने संभाव्य आरोग्यसंकटाची वाट न पाहता तातडीने हस्तक्षेप करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news